सांगली प्रतिनिधी । सांगलीत एसटी संपला एक महिना झाल्यानंतर आर्थिक अडचणीत आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी भिकमांगो आंदोलन केले. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करा या मागणीसाठी गेल्या महिन्यापासून कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. संपाच्या पहिल्या टप्प्यात एसटीची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वेतनवाढीची मागणी मान्य झाल्यानंतर काही कर्मचारी कामावर रुजू झाल्याने एसटीची वाहतूक पूर्वपदावर आली होती.
अद्यापही काही कर्मचारी आंदोलनावात ठाम आहेत. महिना उलटल्यानंतर सांगलीत आज एसटी आंदोलक कर्मचाऱ्यानी सरकार विरोधात घोषणाबाजी करत विलनिकरनाची जोरदार मागणी केली. यावेळी महिनाभराच्या संपामुळे एसटी कर्मचाऱ्यानी स्वतःसाठी भीक मागत आपल्या भावना मांडल्या. या संपामुळे अनेक कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आल्याने आता एसटी कर्मचाऱ्यांवर भीक मागण्याची वेळ आली आहे.
सांगलीत एसटी स्थानकांच्या बाहेरील दुकानांमध्ये एसटी कर्मचाऱ्यानी भीक मागो आंदोलन करीत आपल्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. दरम्यान, आंदोलक कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून अद्यापही कारवाई करण्यात येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन आणखी किती दिवस चालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.