आता माघार नाहीच ! शरद पवारांच्या आवाहनानंतर एसटीचे कर्मचारी संपावर ठाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काल कामावर परतण्याचे आवाहन केले. दरम्यान संपकरी कर्मचार्‍यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करू असे आश्वासन दिल्यानंतरही संपकरी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. विलीनीकरण झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, अशी ठोस भूमिका औरंगाबादेतील संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/461408012025289/

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारी एसटी कर्मचारी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीत संपकरी कर्मचाऱ्यांनी आपल्या कामावर परत यावे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही. एसटी बसची सेवा सुरळीत झाल्यानंतर त्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीनंतर संपकरी कर्मचाऱ्यांनी सकाळी पार पडलेल्या बैठकीवर अविश्वास दाखवत, त्यांनी दिलेल्या आश्वासनावर आमचा विश्‍वास नाही असे स्पष्ट केले. जोपर्यंत एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

Leave a Comment