गाडी लावण्याच्या कारणावरून कोयत्याने वार

Karad Police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | गाडी लावण्याच्या कारणावरुन झालेल्या वादावादीनंतर एकाने चुलत भावासह भावजयवर कोयत्याने वार केले. सदाशिवगड-वनवासमाची, ता. कराड येथे सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत रेखा मारुती कुंभार यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन रमेश भगवंत कुंभार याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिवगड-वनवासमाची येथील मारुती कुंभार यांचा त्यांच्याच घरानजीक राहणारा चुलत भाऊ रमेश कुंभार याच्यासोबत जुना वाद आहे. शनिवारी गाडी लावण्याच्या कारणावरुनही त्यांच्यात वाद झाला होता.

दरम्यान, सोमवारी सकाळी मारुती कुंभार यांचा मुलगा सचिन हा जाब विचारण्यासाठी रमेश कुंभार याच्याकडे गेला असता त्याने हातातील कोयत्याने चुलत भाऊ मारुती कुंभार व भावजय रेखा कुंभार यांच्यावर वार केले. त्यामध्ये ते जखमी झाले. याबाबतची नोंद कराड शहर पोलिसात झाली आहे.