हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा सुप्रसिद्ध स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jaspreet Bhumrah) याला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. आज सकाळीच बुमराहची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganeshan) हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. जसप्रीतने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चहात्यांना दिली आहे. बुमराहच्या कुटुंबात आता नवीन पाहुणा आल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खास म्हणजे, बुमराह आणि संजनाने आपल्या बाळाचे नाव अंगद (Angad) असे ठेवले आहे.
2021 साली जसप्रीत बुमराहने पुण्याच्या संजना गणेशशी लग्न गाठ बांधली. संजना एक मॉडेल आणि क्रीडा अँकर आहे. तिने २०१९ साली झालेला वनडे वर्ल्डकपचे होटींग केले होते. इतकेच नव्हे तर तिने, आयपीएल लिलाव देखील होस्ट केला आहे. संजनाचे पुण्यातील सिम्बॉयसिसमधून बी.टेक झाले आहे. तर तिचे शालेय शिक्षण बिशप शाळेत झाले आहे. अशा या संजनासोबत जसप्रीतने विवाह केला आहे. आज याच दाम्पत्याला गोड असा मुलगा झाला आहे.
जसप्रीत बुमराहने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, “आमचे छोटे कुटुंब मोठे झाले आहे आणि आमची अंतःकरणे कल्पनेपेक्षा भरलेली आहेत. आज सकाळी आम्ही आमच्या लहान मुलाचे, अंगद जसप्रीत बुमराहचे जगात स्वागत केले. आता माझ्या जीवनाचा एक नविन अध्याय सुरू झाला आहे.” बुमराहच्या या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत. अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स करत बुमराह आणि संजनाचे अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, काल 3 सप्टेंबर रोजी जसप्रीत बुमराह आशिया कप सोडून भारतात परत आल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे त्याच्या अशा येण्याने सर्वांनाच बसला होता. तर याबाबत अनेकांनी तर्क वितर्क लावले होते. मात्र तो, संजना आणि आपल्या बाळासाठी भारतात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. जसप्रीत बुमराह बाप झाल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.