गावात राहून सुरु करा ‘हे’ व्यवसाय; लाखोंची कमाई होईल

inflation
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल नोकरीची गॅरेंटी नसल्याने किंवा नोकरी परवडत नसल्याने अनेकजण नव्या व्यवसायाच्या शोधात असतात. प्रामुख्याने गावात राहणाऱ्या लोकांना शहरात जाऊन एखादा व्यवसाय सुरु करणे हे सुद्धा म्हणावे तेवढं सोप्प नसत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा २ व्यवसायांची कल्पना देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही गावात राहूनही या व्यवसायामुळे लाखो रुपये कमवू शकता. तसेच हे व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसेही खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे जर तुम्ही गावात राहणार असाल आणि व्यवसाय करू इच्छित असाल तर नक्कीच या २ बिझिनेस आयडिया बद्दल विचार करा

1) बियाणे दुकान-

गावातील लोकांचे जीवन हे शेतीवर अवलंबून असते. शेती करण्यासाठी बी- बियाणे हे लागतातच. त्यामुळे जर तुम्ही गावात राहात असाल तर खत आणि बियाणांचे दुकान सुरु केल्याने तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. विशेष म्हणजे खते आणि बियाणांसाठी सरकारी अनुदानाचा लाभही मिळतो. याच्या मदतीने तुम्ही सहजपणे व्यवसाय सुरू करण्याचा लाभ घेऊ शकाल. तसेच गावातील लोकांनाही फायदा होईल .

2) कोल्ड स्टोरेज हा देखील चांगला पर्याय ठरेल

साधारणपणे, गावाजवळ किंवा दूरवरपर्यंत कोल्ड स्टोरेज नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना समस्या उद्भवू शकतात. अशा स्थितीत शेतकऱ्यांची फळे व भाजीपाल्याची आणखी नासाडी होण्याची शक्यता असते. जर तुम्ही गावात राहूनच व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही कोल्ड स्टोरेज सुरू करून त्याचा फायदा घेऊ शकता.