हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय पातळीवर धक्का देणारी घटना नुकतीच घडली आहे. तालिबानने काबूलचा ताबा घेतला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील बहुतांश दूतावास रिकामे करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात शिक्षणासाठी असलेल्या अफगाणी विद्यार्थ्यांची आज राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्याशी चर्चाही केली. हे विध्यार्थी महाराष्ट्रात सुखरूप असून त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या केंद्र सरकारकडे पोहचवल्या जातील,’ असे मंत्री ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातही अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांची संख्या साडेतीन ते चार हजार मुलं, मुली अफगाणिस्तानची आहे. या दरम्यान आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी मंत्री ठाकरे यांनी माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, या विद्यार्थ्यांना सध्या आपल्या कुटुंबीयांची चिंता सतावत आहे. शिवाय, आपण घऱी कसे परतणार हा देखील अनेकांना प्रश्न पडला आहे. काहीजणांची पदवी पूर्ण होत आलेली आहे, तर त्यांना देखील चिंता आहे की ते परत कसे जाणार? त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आज त्यांची भेट घेतली असून त्यांच्याशी चर्चाही केली आहे.
महाराष्ट्रात शिक्षणासाठी असलेल्या सुमारे चार ते पाच हजार अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांची आज राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट घेतल्याने विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. या विध्यार्थ्यानी राज्य सरकारचे माध्यमांशी बोलताना आभारही मानले आहेत.