नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर; गरबा, दांडियावर बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यावर्षी नवरात्री उत्सव 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान साजरी केली जाईल. हा उत्सव नऊ दिवसांचा सर्वात मोठा उत्सव आहे. परंतु राज्यातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कडून काही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत.

करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गदी करुन उत्सव साजरा करू नये अशा सूचना राज्य सरकारतर्फे देण्यात आल्या आहे. नवरात्रोत्सव साजरा करताना नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे असे राज्य सरकारेन म्हटले आहे.

काय आहेत मार्गदर्शन तत्वे-

मंडळात 5 हुन अधिक लोकांची उपस्थित नसावी

गरबा- दांडिया आयोजनाला बंदी

आरती- भजन कीर्तन नको

सार्वजनिक मंडळात मूर्तीची उंची 4 फूट असावी, तर घरात 2 फूट उंची असावी

रावण दहनासाठी गर्दी नको

जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची व्यवस्था करावी

माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.

Leave a Comment