हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेऋत्वखाली मूक मोर्चा आंदोलन करण्यात आले. तसेच राज्यातही आशा प्रकारचे ठीक ठिकाणी आंदोलने केली गेली. याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. ते आज राज्य सरकारच्यावतीने मागे घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. याप्रकरणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारचे आभारही मानले आहेत.
राज्यातील महत्वाच्या मानल्या गेलेल्या मराठा समाजातील आरक्षणाचा प्रश्न अजूनही राज्य सरकारकडून सोडवला जात आहे. मात्र, या आरक्षण मागणीसाठी राज्यभरात राज्य सरकारच्या विरोधात मराठा समाजातील समाजबांधवांमध्ये संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे राज्यभर मराठा समाज बांधवांनी चक्काजाम आंदोलनेही केली. या प्रकरणी आक्रमक पावित्रा घेत नुकतेच कोल्हापूर येथे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही मूक मोर्चाचे आंदोलन केल.
राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापुरात मूक मोर्चाचे आंदोलन करीत मराठा समाजच्या आरक्षण प्रश्नासह त्यांच्यावरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, काही महत्वाच्या मागण्या राज्य सरकारकडे केल्या. या मागणीतील आंदोलकांवरील गुन्ह्याची मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली असून आंदोलकांवरील गुन्हे हे सरकारच्यावतीने मागे घेण्यात आले आहेत. मराठा समाजाच्या प्रश्नी केलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे व जितेंद्र आव्हाड यांनीही राज्यसरकारकडे केली होती.