मराठा समाजाला खूश करण्यासाठी राज्य सरकार दलितांवर अन्याय करत आहे : रामदास आठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण 1950 पासून मिळत होते. मात्र मध्यंतरी कोर्टात निर्णय विरोधात आलेला आहे, त्यामुळे आता ते आरक्षण मिळत नाही. आता राज्य सरकारला अधिकार दिलेले आहेत. आता त्याच्याच हातात आहे. दलित आणि अदिवसी यांना न्याय दिला पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने बैठक बोलावली पाहिजे. राज्य सरकारने मराठा समाजासह इतरांना खूश करण्यासाठी दलितांना मिळत असलेले आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इतरांना खूश करण्यासाठी दलितांवर राज्य सरकार अन्याय करत आहेत. फुले, शाहू, आंबेडकर यांचे नांव घेत आहे, मात्र त्यांना न्याय देत नसल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले यांना केला आहे.

सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर सातारा येथे पत्रकारांशी ते बोलत होते. रामदास आठवले म्हणाले, महाविकास आघाडीवर लोकांच्यात नाराजी आहे. त्यामुळे 2024 मध्ये महाराष्ट्रात बीजेपी आणि आरपीआई यांचे सरकार येणार असून त्यादृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे.

नारायण राणेंची भाषा शिवसेनेचीच : रामदास आठवले

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या वादावर बाबत बोलताना रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री ठाकरे ज्या वेळी माझ्या सोबत होते. त्यावेळी त्यांना सगळं काही लक्षात रहायचे असा मिश्किल टोला त्यांनी लगावला आहे. यावेळी बोलताना नारायण राणे यांची भाषा ही शिवसेनेची भाषा आहे. नारायण राणे यांच्या पाठीशी मी आणि आमची संघटना उभी आहे. राणे यांना अटक त्यांचा अपमान करण्याचा प्रकार आहे. राणे यांना जी अटक करण्यात आली तो त्यांचा अपमान करण्याचा प्रकार आहे. उद्धव ठाकरे यांना सत्ता मिळाली आहे त्याचा त्यानी दुरुपयोग करू नये.

Leave a Comment