मराठा आरक्षण लढ्यात मृत्यू झालेल्या 22 जणांच्या कुटुंबीयांना नोकरी – राजेश टोपे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमेकांवर चांगलेच टीकास्त्र डागण्यात आले. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने आरक्षणातील लढ्यात मृत्यू पावलेल्यांसाठी केलेल्या मदतीविषयी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी माहिती दिली. “मराठा आरक्षण लढ्यात मृत्यू झालेल्या 42 आंदोलकांपैकी 22 जणांच्या कुटुंबीयांनी एसटी महामंडळात नोकरी देण्यात आली असून इतर 20 आंदोलकांच्या कुटुंबीयांनी नोकरीचा अधिकार राखीव ठेवला आहे. तसेच त्यांना 10 लाखांची आर्थिक मदतही देण्यात आली असल्याचे टोपे यांनी सांगितले आहे.

डॉ. राजेश टोपे यांनी ट्विट करीत याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून “जालना येथे जिल्ह्यातील मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या सुनील भाऊसाहेब खांडेभराड, गणेश नन्नवरे, किरण कृष्णा कोलते बलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटुंबातील वारसांना 10 लक्ष रुपये धनादेशाचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान डॉ. टोपे यांनी माध्यमांशीही संवाद साधत त्यांना माहिती दिली. त्यांनी म्हंटले आहे की, 42 कुटुंबीयांपैकी 11 कुटुंबांना त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या घऱातील मुलाला एसटी महामंडळात दिली आहे. 11लोक जे खऱ्या अर्थाने नियमात बसत नाहीत अशांनादेखील MSRTC ने विशेष बाब म्हणून बोर्डात मान्यता दिली असून त्यांचीदेखील भरती केली जात आहे. 42bपैकी 22 जणांना प्रत्यक्ष नोकरी देण्यात आली आहे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेकांनी बलिदान दिलं आहे. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने झालेल्या आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी दिली जावी अशी मागणी केली जात होती.