राज्यस्तरीय कुस्तीपटुची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलानी

फलटण येथील माजी नगरसेवक किशोर उर्फ गुड्डू पवार यांच्या राज्यस्तरीय कुस्तीपटू मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक किशोर उर्फ गुड्डू पवार यांचे सुपुत्र पै. प्रतिक किशोर पवार वय 18 वर्ष रा. जाधववाडी ता फलटण याने राहत्या घरी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घरात कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना घरातील लोकांना समजतात त्याला तातडीने अधिक उपचारासाठी फलटण येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले .फलटण शहरातील एक उमदा पैलवान म्हणून तो परिचित होता त्यांच्या घरातील आजोबा व वडील यांनी त्याला चांगल्या पद्धतीने पैलवानकी शिकवली होती यामुळे त्याने विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा, विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत, तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने कमी वयातच ठसा उमटवला होता.

आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मात्र या हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने फलटण तालुक्यात लोकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.