कोरेगाव प्रतिनिधी | मुकुंदराज काकडे
सद्यस्थिती सर्व उद्योगधंदे सरकारने सुरू केले आहेत. परंतु खरच ज्यांचे हातावरचे पोट आहे असे छोटे- मोठे आठवडा बाजार करून जगणारे गोरगरीब नागरिक सध्या मोठ्या हालअपेष्टा सोसत आहेत, यांचे जगणे मुश्कील झाले आहे. तेव्हा कोरेगाव तालुक्यातील आठवडा बाजार सुरू करण्यासाठी राजवंश आठवडा बाजार संघटनेतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या सर्व उद्योगधंदे सुरू केलेले आहेत. परंतु गोरगरीब लोकांसाठी आठवडा बाजार महत्वाचा आहे. यावेळी प्रांताधिकाऱ्यांना गोरगरीब व्यापाऱ्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली. सामान्य लोकांचे पोटाचे हाल होत आहेत. तेव्हा लवकरात लवकर शासनदरबारी पाठपुरावा करून आमचे हाल सरकार पर्यंत पोहचवावेत ही मागणी प्रांत ज्योती पाटील यांच्याकडे केली.
यावेळी राजवंश आठवडा बाजार संघटनेचे अध्यक्ष जयवंत पवार, उपाध्यक्ष मुकुंदराज काकडे, सचिव अर्जुन आवटे, खजिनदार गणेश कुर्ले, संचालक आण्णा कांबळे, निलेश आवटे, पुरूषोत्तम खांडेकर, सनी शिवदास,सोमनाथ वाघमारे,संतोष भोसले, जालिंदर शिंदे, हरिदास यादव, उज्वला मतकर, विजय जाधव, अनिल शिर्के, विजय चव्हाण, विशाल क्षीरसागर,संतोष निदान व राजवंश आठवडा बाजार संघटनेचे पदाधिकारी व सभासद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते