हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । e-PAN Card : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून जारी करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी पॅन कार्ड हे एक आहे. हा 10-अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे ज्यामध्ये आपल्या टॅक्स संबंधीची माहिती असते. त्यामुळे जर ते हरवले तर आपली महत्त्वाची कामे खोळंबतील. याबरोबरच ते पुन्हा बनवण्यासाठी सर्व कागदपत्रे संबंधित विभागाकडे जमा करावी लागतील.
मात्र आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून e-PAN Card चे पीडीएफ आपल्या डिव्हाइसवर डाउनलोड करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. याद्वारे आपल्याला कधीही आणि कुठेही आपल्या गरजेनुसार पॅन कार्ड वापरता येईल. हे लक्षात घ्या कि, ई-पॅन कार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्याचे दोन मार्ग आहेत. यासाठी सर्वांत आधी आपल्याला NSDL च्या वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर आपल्याला ई-पॅन डाउनलोड करण्याचे 2 मार्ग दिसतील. तुम्हाला यापैकी एक निवडावा लागेल. चला तर मग त्याविषयी स्टेप बाय स्टेप जाणून घेउयात…
पॅन कार्ड क्रमांकाद्वारे अशा प्रकारे डाउनलोड करा e-PAN Card
10 अंकी अल्फान्यूमेरिक नंबर एंटर करा.
आता आधार क्रमांक, जन्मतारीख, GSTN (पर्यायी) आणि कॅच कोड टाका.
डिटेल्स सबमिट केल्यानंतर बॉक्सवर टिक करा.
कॅप्चा एंटर करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
आता ई-पॅन डाउनलोड करण्यासाठी Download PDF वर क्लिक करा.
एकनॉलेजमेंट नबंरद्वारे अशा प्रकारे डाउनलोड करा e-PAN Card
सर्व प्रथम, एकनॉलेजमेंट नबंर एंटर करा.
आवश्यक असलेले पर्सनल डिटेल्स आणि कॅप्चा कोड एंटर करा.
सबमिट बटणावर क्लिक करा.
आता ई-पॅन कार्ड आणि PDF स्क्रीनवर दिसेल.
ई-पॅन डाउनलोड करण्यासाठी Download PDF वर क्लिक करा.
पॅन कार्ड कुठे कुठे वापरले जाते???
इन्कम टॅक्स भरण्यासाठी, बँक खाते उघडण्यासाठी, एफडी किंवा डिपॉझिट्स खाते उघडण्यासाठी, क्रेडिट कार्ड किंवा बँक कर्ज घेण्यासाठी, डीमॅट खाते उघडण्यासाठी किंवा जास्त व्हॅल्यूचे इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी पॅन कार्डचा वापर केला जातो. याशिवाय, बँकेतून एकाच वेळी मोठी रक्कम काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी देखील पॅन कार्ड जरुरीचे आहे. डिमॅट खात्याशिवाय आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवता येत नाही, तिथेही पॅन कार्ड आवश्यक आहे. याबरोबरच पॅन कार्ड ओळखपत्र म्हणूनही वापरात येते. e-PAN Card
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html
हे पण वाचा :
SOVA Trojan : सावधान !!! जर आपल्या फोनमध्ये आला असेल ‘हा’ व्हायरस तर …
Bank FD : ‘या’ बँकेने लाँच केली स्पेशल FD स्कीम !!! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 8.40 % व्याज