Share Market : बाजारात खालच्या स्तरावरून मोठी सुधारणा, सेन्सेक्सने 514 अंकांनी घेतली उडी तर निफ्टी 17,550 च्या पुढे गेला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । आज मंगळवारी भारतीय शेअर बाजाराची खालच्या पातळीवरून मोठी रिकव्हरी झाली आहे. सेन्सेक्स 514.34 अंकांनी उडी मारून 59005.27 वर बंद झाला तर निफ्टी 165.10 अंकांनी चढून 17,560 वर बंद झाला. आजच्या सत्रात बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, आयटीसी आणि आयटी क्षेत्राने बाजाराला भक्कम आधार दिला.

कमकुवत जागतिक संकेतांच्या दरम्यान, बाजाराने आज कमकुवतपणासह सुरुवात केली. परंतु संपूर्ण दिवसाच्या ट्रेडिंगदरम्यान कंसोलिडेशनच्या मूडने बाजारावर वर्चस्व गाजवले आणि शेवटी बाजार दिवसाच्या वरच्या पातळीवर बंद होण्यात यशस्वी झाला. आजच्या ट्रेडिंगमध्ये, लहान आणि मध्यम शेअर्समध्येही खरेदी झाली आणि बीएसई मिडकॅप इंडेक्स 0.91 टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्स 0.21 टक्क्यांवर बंद झाला.

निफ्टी अपडेट
JSW Steel, Bajaj Finance, ONGC, IndusInd Bank and Bajaj Finserv निफ्टी चे top gainers राहिले तर Maruti Suzuki, BPCL, Hero MotoCorp, Bajaj Auto and Nestle निफ्टीचे top losers राहिले.

सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 24 शेअर्स नफ्यासह आणि 6 शेअर्स घसरणीने बंद झाले. बजाज फायनान्सचा स्टोक 4.94% आणि इंडसइंड बँकेचा 4.72% वाढला. दुसरीकडे, मारुतीच्या शेअर्समध्ये 2.54%ची घसरण दिसून आली.

गेल्या तीन महिन्यांत जवळपास 1 कोटी नवीन गुंतवणूकदारांची भर पडली
भारतीय शेअर बाजारात सामान्य गुंतवणूकदारांची आवड सातत्याने वाढत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन महिन्यांत सुमारे 1 कोटी नवीन गुंतवणूकदार सामील झाले आहेत. BSE ने म्हटले आहे की,”6 जून ते 21 सप्टेंबर 2021 दरम्यान 1 कोटी नवीन युनिक क्लायंट कोड रजिस्टर (गुंतवणूकदारांकडून मिळालेला युनिक कोड) आहेत. BSE च्या इतिहासातील ही सर्वात वेगवान गुंतवणूकदारांची गुंतवणूक आहे.”

यासह, एक्सचेंजमध्ये रजिस्टर्ड असलेल्या गुंतवणूकदारांची संख्या 7 कोटी वरून 8 कोटी झाली आहे. जून 2021 मध्ये BSE ने 7 कोटी गुंतवणूकदारांच्या संख्येला स्पर्श केला. या तुलनेत, एक्सचेंजला यापूर्वी 1 कोटी गुंतवणूकदार जोडण्यासाठी सुमारे 6 महिने लागले. BSE ने जानेवारी 2021 मध्ये कोटी गुंतवणूकदारांच्या आकड्याला स्पर्श केला. अशाप्रकारे, यावर्षी आतापर्यंत सुमारे 2 कोटी नवीन गुंतवणूकदार BSE मध्ये सामील झाले आहेत.

Leave a Comment