नवी दिल्ली । सहा ट्रेडिंग सत्रांपासून सुरू असलेल्या घसरणीचा ट्रेंड बुधवारी भारतीय शेअर बाजाराने मोडला. ट्रेडिंगच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टीने स्थिर वाटचाल केली.
सेन्सेक्सने 333 अंकांच्या वाढीसह ट्रेडिंगला सुरुवात केली आणि 57,633 वर उघडला. त्याचप्रमाणे निफ्टीनेही 103 अंकांच्या वाढीसह 17,194 अंकांवर खुले होऊन ट्रेडिंग सुरू केले. गुंतवणूकदारांच्या सकारात्मक वृत्तीमुळे सकाळी 9.30 वाजता सेन्सेक्स 427 अंकांनी तर निफ्टी 137 अंकांच्या वाढीसह ट्रेड करत होता.
बाजार उघडल्यानंतर बीएसईवर लिस्टेड सुमारे 1,388 शेअर्स वाढले आणि 554 शेअर्स घसरले. कोटक महिंद्रा बँक, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि बीपीसीएल निफ्टीवर ट्रेड करत होते, तर ओएनजीसी आणि एल अँड टी घसरले होते. तेल आणि वायू, ऊर्जा, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि रिअल इस्टेटमध्ये सुमारे 1 टक्क्यांची वाढ दिसून आली.
आशियाई बाजार देखील ग्रीन मार्कवर
बुधवारी आशियातील बहुतांश बाजार ग्रीन मार्कवर ट्रेड करताना दिसले. सिंगापूर एक्सचेंज 0.44 टक्के, तैवान 0.19 टक्के आणि दक्षिण कोरिया 0.66 टक्के वाढले. आशियाई बाजारातील या तेजीचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवरही दिसून येईल आणि आज बाजार ग्रीन मार्कवर उघडेल अशी अपेक्षा तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.