“पैहचान कौन ?”; मलिकांवरील कारवाईनंतर नितेश राणेंचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडीच्यावतीने आज राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची चौकशी केली जात आहे. मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. राणेंनी एका डुक्कराचा जाळ्यात अडकल्याचा फोटो शेअर केला असून त्यावर पेहचान कौन असे लिहले आहे.

नितेश राणे यांच्याकडून अनेकवेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज पहाटे मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. ईडीच्या कारवाईनंतर आता भाजप नेत्यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान नितेश राणे यांनी आज सकाळी ट्विट करीत मलिक यांच्यावर टीका केली आहे.

ईडीच्या कारवाईवरून एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून भाजपवर आरोप केला जात आहे. या दरम्यान आज मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईवरून पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे.