“सत्य बोलत असल्यानेच मलिकांवर कारवाई, 2024 नंतर ते आणि आम्ही आहोत”; संजय राऊतांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडीच्यावतीने आज राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची चौकशी केली जात आहे. मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नवाब मलिक यांच्यासारखे खूप लोक सत्य बोलून असत्य उघड करत आहे. त्यांच्यामागे आता देशभरात ईडी, सीबीआय लावली जात आहे. आज सकाळी मलिक यांच्या घरी ईडीची लोक आले आणि त्यांना घेऊन गेले. अशा प्रकारच्या चौकशा 2024 पर्यंत चालतील. त्यानंतर आम्ही आणि तेच आहोत, असे राऊत यांनी म्हंटले.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्यावर एडीच्यावतीने केलेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी राऊत म्हणाले की, मलिकी यांच्यासह आमच्यासारखे खूप लोक आहेत, जे सातत्याने बोलत आहे. म्हणून त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. नक्कीच ते संध्याकाळी घरी येतील.

ईडीच्यावतीने 20-20 वर्षानंतर जीनी पुराणी प्रकरणे बाहेर काढून चौकशी केली जात आहे. किरीट सोमय्या यांनीही काही प्रकरण ईडीकडे दिलेली आहेत. भ्रष्टाचारा विरोधात लढणारे महात्मा हा शब्द चांगला आहे, कारण त्यांना मी काही बोललो तरी वाटतं मी शिवी दिली. जे महात्मा आहेत, त्यांनी ईडी कडे अनेकांची प्रकरणे दिलेली आहेत, त्यांना का समन्स गेले नाही?. “आता ही सगळी प्रकरणे आम्ही परत एकदा ईडीकडे घेऊन जाणार आहोत. तक्रार कशी करायची हे आम्हाला माहिती आहे, असेही राऊत यांनी सांगितले.