Stock Market : उघडताच सेन्सेक्स 800 अंकांनी वाढला तर निफ्टीने पुन्हा पार केला 17 हजारांचा टप्पा

Stock Market
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली I भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या वाढीसह ट्रेड सुरू केले. उघडताच सेन्सेक्स 800 च्या वर गेला, तर निफ्टीने 17 हजारांचा आकडा पार केला.

सेन्सेक्सने आज 803 अंकांच्या वाढीसह ट्रेडिंगला सुरुवात केली आणि 57,620 वर उघडला. त्याचप्रमाणे निफ्टीने 228 अंकांच्या वाढीसह ट्रेडिंगला सुरुवात केली आणि तो 17,203 वर उघडला. बाजारातील गुंतवणूकदारांचा विश्वास आज उंचावला आणि खरेदी सुरूच राहिली. सकाळी 9.35 वाजता सेन्सेक्स 748 अंकांच्या वाढीसह 57,564 वर ट्रेडिंग करत होता, तर निफ्टी 212 अंकांनी वधारून 17,187 अंकांवर होता.

कोणत्या सेक्‍टरची कामगिरी कशी झाली?
बीएसईवरील जवळपास सर्वच सेक्‍टर आज ग्रीन मार्कवर ट्रेड करत होते. ट्रेड सुरू झाला तेव्हा, सुमारे 1,676 शेअर्स वाढले, तर 331 शेअर्समध्ये घट झाली आणि 66 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. ऑटो, बँक, कॅपिटल गुड्स, रिअल इस्टेट, एफएमसीजी, फार्मा आणि पीएसयू सेक्टरमध्ये 1 टक्क्यांहून अधिक उसळी दिसत आहे.

या शेअर्सवर जोरदार सट्टेबाजी
गुंतवणूकदारांनी आज बँकिंग शेअर्सवर जोरदार सट्टा लावला. त्यामुळे सकाळच्या ट्रेड मध्येच एचडीएफसी, अल्ट्राटेक सिमेंट, एक्सिस बँक, श्री सिमेंट्स आणि बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. दुसरीकडे, ओएनजीसी आणि आयओसीसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

आशियाई बाजारही तेजीने उघडले
गुरुवारी सकाळी आशियातील बहुतांश शेअर बाजार तेजीसह उघडले. सिंगापूरच्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये 1.62 टक्क्यांची उसळी पाहायला मिळत आहे, तर जपानचा निक्केई 3.59 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. याशिवाय दक्षिण कोरियाचा शेअर बाजारही 1.82 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे.