हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : टाटा ग्रुपची महागडी फॅशन पोशाख, फुटवेअर आणि एक्सेसरीज विकणारी कंपनी Trent चे शेअर्स वर्षभरात मोठी उडी घेईल अशी अपेक्षा मोठ्या ब्रोकरेज फर्मने व्यक्त केली आहे. ICICI सिक्युरिटीज आणि मोतीलाल ओसवाल या दोन्ही ब्रोकरेज हाऊसेसचा असा विश्वास आहे की, कंपनीचे फंडमेंटल्स मजबूत आहेत आणि पुढे जाऊन त्याच्या व्यवसायात चांगली वाढ होईल. हे लक्षात घ्या कि, मंगळवारी Trent चे शेअर्स 0.53 टक्क्यांनी वाढून 1,054.35 रुपयांवर ट्रेड करत होते.
ICICI सिक्युरिटीजकडूनही ट्रेंटच्या स्टॉकला BUY रेटिंग दिले गेले आहे. त्याची टार्गेट प्राईस 1,470 रुपये निश्चित केली आहे. या ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, ही कंपनी 2023-24 या आर्थिक वर्षात आणखी 250 स्टोअर्स उघडतील. तसेच आपला व्यवसाय वाढवण्यासाठी कंपनीकडून 600 कोटींहून जास्तीची गुंतवणूक करण्यात येणार आहे. Stock Market
ICICI सिक्युरिटीजने सांगितले की, ज्युडिओ हा सर्वात वेगाने वाढणारा व्हॅल्यू फॅशन ब्रँड आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये त्याचा महसूल 1 हजार कोटींच्या पुढे आहे. या ब्रँडने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 6 टक्के EBITDA मार्जिन गाठले आहे. त्याचप्रमाणे, वेस्टसाइड आणि झारा इंडियाचे निकाल देखील आर्थिक वर्ष 2022 मध्ये उत्कृष्ट राहिले आहेत. Stock Market
जागतिक अस्थिरतेमुळे शेअर बाजारामध्ये घसरण होत आहे. मात्र बाजारातील या घसरणीचा Trent च्या शेअर्सवर फारसा परिणाम झालेला नाही. या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात फक्त एक टक्काच घसरण झाली आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये Trent चे शेअर्स 2.19 टक्क्यांनी घसरले आहेत. तर गेल्या 6 महिन्यांत याने 3.54 टक्के रिटर्न दिला आहे. त्याच वेळी, Trent च्या स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना 23 टक्के नफा दिला आहे. Stock Market
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने Trent ला BUY रेटिंग दिले आहे. यावेळी त्याची टार्गेट प्राईस 1,430 रुपये वाढवली आहे. याआधी मोतीलाल ओसवालने याला 1,180 रुपये टार्गेट प्राईस दिली होती. Stock Market
अधिक माहिती साठी या वेबसाईटला भेट द्या : https://trentlimited.com/
हे पण वाचा :
Aadhaar Card शी संबंधित कोणत्याही माहितीसाठी अर्ज कसा करावा ??? समजून घ्या
SBI च्या ‘या’ स्कीमध्ये गुंतवणूक करून दरमहा मिळवा इतके पैसे !!!