एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे अनेक शिवसैनिक नाराज, जोरदार घोषणाबाजी करत व्यक्त केला संताप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेच्या गोट्यात अस्वस्थता पसरली आहे. यामुळे राज्यभरातून शिवसैनिकांचा संताप पाहायला मिळत आहे. यावेळी मुंबईतील भारतमाता चौकात सेनेच्या कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं. काही शिवसैनिकांनी वर्षा बंगल्यावर धाव घेत एकनाथ शिंदेंविरोधात (Eknath Shinde) घोषणाबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनीही समोर येऊन त्यांना वज्रमूठ दाखवली.

दुसरीकडे सोशल मीडियावरही एकनाथ शिदेंच्या (Eknath Shinde) अकाऊंटवर विविध नाराजीच्या प्रतिक्रिया येत आहे. त्यामुळे शिंदेच्या बंडामुळे शिवसैनिक नाराज असल्याचे दिसून येत आहे. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. अत्यंत जहरी शब्दात त्यांच्यावर टीका करण्यात आली. अनेक सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी तर एकनाथ शिंदेंविरोधात अभद्र शब्दांचाही वापर केला.

https://twitter.com/RajaramUbhe/status/1539262358312263683

एकनाथ शिंदे यांना (Eknath Shinde) शिवसेनेच्या 30 पेक्षा जास्त आमदारांचं समर्थन आहे. तसेच 4 अपक्ष आमदारांचादेखील शिंदेंना (Eknath Shinde) पाठिंबा आहे. हे आकडे ताजे असताना आता महाराष्ट्रातील आणखी सात आमदार दिल्लीला रवाना झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घडामोडींमुळे महाविकास आघाडी सरकार आणखी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. यामुळे येणाऱ्या काही वेळात महाराष्ट्राच्या राजकाररणाचे चित्र स्पष्ट होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेला लागलेली गळती रोखण्यात यशस्वी होतात का ते पाहणे महत्वाचे आहे.

हे पण वाचा :
बनावट क्रिप्टो एक्सचेंजने फ्रॉडद्वारे भारतीय गुंतवणूकदारांचे लुटले 1000 कोटी रुपये – रिपोर्ट

दुचाकीसह पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडाले पती-पत्नी, Video आला समोर

पुढंच्या एका तासात राज्यात काय घडत बघा; राणेंचा इशारा

शिवसेनेच्या आमदारांना गुजरात मध्ये मारहाण; संजय राऊतांचा आरोप

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिलाय, त्यामुळे ठाकरेंनी आता…; रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

Leave a Comment