नवी दिल्ली । शेअर बाजारामध्ये आज वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी सुरुवातीच्या काळात BSE Sensex 280 अंक किंवा 0.53 टक्क्यांच्या तेजीसह 52,811.42 वर ट्रेड करीत आहे. त्याचबरोबर NSE Nifty 53.60 अंकांनी वाढून 15,865.45 वर ट्रेड करीत आहे. सकाळी टायटन आणि डॉ. रेड्डी यांच्या शेअर्स वगळता बहुतेक सर्व जण ग्रीन मार्कवर ट्रेड करताना दिसले. त्याचबरोबर काल लोअर सर्किटनंतर अदानी ग्रुपचे शेअर्स आज वाढले आहेत. NSE तील अदानी पोर्टचा स्टॉक टाॅप गेनर मध्ये समाविष्ट आहे.
‘हे’ शेअर्स वाढले आहेत
BSE वर टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, एक्सिस बँक, कोटक बँक, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर, पॉवर ग्रिड, रिलायन्स, एचडीएफसी, एनटीपीसी, एम अँड एम, भारती एअरटेल, द. बजाज ऑटो, मारुती, सन फार्मा, ओएनजीसी, नेस्ले इंडियाचे शेअर्स वाढत आहेत.
‘हे’ आहेत टाॅप गेनर्स आणि लूजर्स
NSE मध्ये आज अदानी पोर्ट्स TOP गेनर आहे. यानंतर आयशर मोटर, ओएनजीसी, इंडसइंड बँक, कोल इंडिया यांचे शेअर्स आहेत. त्याचबरोबर जेएसडब्ल्यू स्टील, हिंडाल्को, यूपीएल, एसबीआय आणि बजाज फायनान्सचे शेअर्स लूजर्स ठरले आहेत.
2,582 कंपन्यांच्या व्यवहार शेअर्समध्ये
सकाळी BSE वर सुमारे 2,582 कंपन्यांच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग सुरू आहे. त्यापैकी 1,912 वधारत तर 586 वर घसरण नोंदवित आहेत. आजची मार्केटकॅप 2 कोटी 31 लाख रुपये आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा