अभिनेत्रीचा मड बाथ पाहिला का? चिखलात माखलेला फोटो पाहून ओळखणेही झाले कठीण

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. इतकेच नव्हे तर आपल्या चाहत्यांकडून कौतुकाची थाप देखील मिळते. वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येणारी उर्वशी यावेळी एका थेरेपीमुले चर्चेत आलीये. होय. तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात ती पूर्णपणे चिखलात माखलेली दिसतेय. आता तुम्ही म्हणाल हि कुठे गेली होती चिखलात लोळायला? तर असं काही नाही तिने स्वतःच स्वतःच्या अंगावर चिखल लावून घेतला आहे. या फोटोत उर्वशी मड बाथ थेरेपी घेताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर यासोबत तिने त्याचे फायदेदेखील सांगितले आहेत. तिच्या या पोस्टवर अनेकजण मजेशीर कमेंट्स करत आहेत.

उर्वशीने हा फोटो शेअर करत लिहिले की, माझा फेव्हरिट मड बाथ स्पा/ मड थेरपी. क्लियोपेट्रा जुनी होती जिला मड बाथ आवडत होते. मॉडर्न फॅन्समध्ये मी सहभागी आहे. बलेरिक बीचच्या लाल मातीची मजा घेते आहे. असे म्हटले जात होते की रोमन प्रेमाची देवी याला आरसा म्हणून वापरत होती. ही मिनरल रिच माती असते ज्यामुळे स्किनसाठी थेराप्युटिक आणि चांगली मानली जाते. हे डिटॉक्सिफाइड करते. अशुद्धी बाहेर काढते, त्वचा मृदू बनवते. सर्कुलेशन वाढवते आणि दुखण्यावरही आराम देते.

उर्वशीच्या या फोटोवर तिचे चाहते भरभरून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर यासोबत तिच्या या पोस्टवर मजेशीर कमेंट्सदेखील करीत आहेत. उर्वशी रौतला आपल्या सौंदर्यासोबत फिटनेसची देखील तितकीच काळजी घेत असते हे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटला न्याहाळले कि लगेच कळून येते. कारण तिचे वर्कआउट करतानाचे बरेच व्हिडीओ ती इंस्टाग्रामवर शेअर करत असते. कोरोनाच्या काळातही ती घरात न बसता इतरांच्या मदतीसाठी मैदानात उतरली आहे. उर्वशीनेसुद्धा इतर कलाकारांप्रमाणे समाजाच्या तळागाळात पोहोचून काम करण्यासाठी नुकतीच एका फाउंडेशनची सुरुवात केली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून ती स्वत: रस्त्यावर उतरून गरजूना मदत करताना दिसते आहे.

You might also like