Stock Market : शेअर बाजाराचा नवा विक्रम, सेन्सेक्सने पहिल्यांदाच 54,000 चा टप्पा केला पार तर निफ्टी 16,196 वर उघडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मंगळवारी विक्रम केल्यानंतर भारतीय शेअर बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज बुधवारी जोरदार उघडला. BSE सेन्सेक्स 344 अंकांच्या वाढीसह म्हणजेच 0.64% वाढून 54,167.36 वर उघडला. त्याच वेळी, NSE निर्देशांक निफ्टी 65.40 अंकांनी वाढून 16,196.15 वर उघडला.

काल (3 ऑगस्ट) देशांतर्गत शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर बंद झाला. निफ्टीने पहिल्यांदाच 16 हजारांचा टप्पा ओलांडला. त्याच वेळी, सेन्सेक्स 53,800 च्या पुढे बंद करण्यात यशस्वी झाला.

या स्टॉकमध्ये झाली वाढ
बीएसई, एचडीएफसी, टाटा स्टील, इन्फोसिस, डॉ रेड्डीज, एचडीएफसी बँक, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, पॉवर ग्रीड, एचडीएफसी बँक, एशियन पेंट, बजाज फायनान्स, एम अँड एम, एचसीएल टेक, बजाज ऑटो, इंटसइंड बँक, टीसीएस, एनटीपीसी, बजाज फिनसर्व, एलटी, रिलायन्स, आयटीसी, मारुती, टायटन, एक्सिस बँक आणि अल्ट्रा सिमेंटचे शेअर्स ग्रीन मार्कवर ट्रेड करत आहेत. त्याचबरोबर भारती एअरटेल, एसबीआय, हिंदुस्तान युनिलिव्हर, सन फार्मा आणि नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

येथे टॉप -5 गेनर्स आणि लूजर्स
आज NSE वर टॉप -5 गेनर्सच्या लिस्टमध्ये अदानी पोर्ट्स, एचडीएफसी, इन्फोसिस, टाटा स्टील आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स आहेत. त्याचबरोबर, लूजर्समध्ये भारती एअरटेल, ओएनजीसी, टाटा कन्झ्युमर, एसबीआय लाइफ आणि हिंडाल्कोचे शेअर्स आहेत.

1,569 कंपन्यांचे शेअर्स वाढले
आज BSE वर ट्रेडिंग सुरू करताना, सुमारे 1,569 कंपन्यांच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग दिसून येते. यामध्ये 1,148 कंपन्यांचे शेअर्स वाढले आहेत. त्याच वेळी, 343 कंपन्यांचे शेअर्स घसरत आहेत. आजची एकूण मार्केट कॅप 2,41,08,106.55 लाख रुपये आहे.

आज 4 IPO उघडणार
INTERNATIONAL, WINDLAS BIOTECH, KRSNAA DIAGNOSTICS आणि EXXARO TILES ची पब्लिक ऑफर आज येईल. चारही इश्श्यू शुक्रवारपर्यंत खुले राहतील.