Stock Market Today: सेन्सेक्स 533 तर निफ्टी 148 अंकांनी खाली आला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कमकुवत जागतिक निर्देशांमुळे, बाजारात सलग सहाव्या दिवशी विक्री होताना दिसून येत आहे. शुक्रवारी (19 मार्च 2021), आठवड्यातील शेवटचा व्यापार दिवस, शेअर बाजार रेड मार्कवर उघडला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मधील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 244.16 अंकांनी घसरून (0.50 टक्के) 48,972.36 पातळीवर खुला झाला. सकाळी बीएसईचा सेन्सेक्स 548 अंकांनी खाली 48,668.39 वर ट्रेड करीत आहे. त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE ) निफ्टी 14400 च्या खाली आला आहे. निफ्टी आणि निफ्टी बँक एका आठवड्यात 4 ते 6 टक्क्यांनी घसरले. मिडकॅपमध्ये सर्वाधिक 2.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार घसरत आहे. गेल्या आठवड्यात बीएसईचा -30 शेअर्सचा सेन्सेक्स 386.76 अंक किंवा 0.78 टक्क्यांनी वधारला. तर या आठवड्यात आतापर्यंत दररोज बाजार घसरणीसह बंद झाला आहे.

एकूण 2,433 कंपन्या ट्रेड करीत आहेत
बीएसईमध्ये एकूण 2,433 कंपन्या ट्रेड करीत आहेत. 1,924 कंपन्यांचे शेअर्स खाली आले आहेत. आज 89 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप 199.10 लाख कोटींवर गेली आहे, जी काल 201.12 लाख कोटी रुपये होती.

जागतिक बाजारात घसरण
जपानचा निक्केई निर्देशांक 285 अंकांनी किंवा 0.94 टक्क्यांनी खाली 29,931 वर ट्रेड करीत आहे. हाँगकाँगचा हँगसेन्ग निर्देशांक 458 अंक म्हणजेच 1.56 टक्क्यांनी घसरून 28,946 वर आला. त्याचप्रमाणे चीनचा शांघाय कंपोझिट आणि कोरियाचा कोस्पी निर्देशांकही प्रत्येकी एक टक्क्यांनी घसरला आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑल ऑर्डिनरीज 25 अंकांच्या किंचित घसरणीसह 6,978 अंकांवर ट्रेड करीत आहेत. नॅस्डॅक निर्देशांक 3.02 टक्क्यांनी घसरून 13,116 अंकांवर बंद झाला. एस अँड पी 500 निर्देशांक 1.48 टक्क्यांनी घसरून 3,915 अंकांवर होता. डाव जोन्सही 153 अंकांनी खाली 32,862 वर बंद झाला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group