औरंगाबाद – महापालिकेला कोरोना प्रतिबंधासाठी दहा हजार लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पाच दिवस लसीकरण योग्य पद्धतीने चालेल असे मानले जात आहे. राज्य सरकारकडून महापालिकेला कोरोना प्रतिबंधासाठी लसींचा साठा उपलब्ध करून दिला जातो. लसींचा वापर लक्षात घेऊन महापालिका काही दिवस आधीच सरकारच्या आरोग्य विभागाकडे लसींची मागणी होती. परंतु सरकारकडून लसींचा पुरवठा करताना वेळ लागत असल्याचे लक्षात आले आहे.
गुरुवारी लसींचा साठा जवळपास संपला होता. केवळ दीड हजार लसी शिल्लक होत्या. सरकारकडून साठा उपलब्ध न झाल्यास दीड हजार लसी वापरून लसीकरण शुक्रवारी बंद पडले असते. मात्र, सरकारने रात्रीतून महापालिकेला दहा हजार लशींचा साठा उपलब्ध करून दिला. लसीचा साठा प्राप्त झाल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोडकर यांनी दिली.
दररोज सरासरी दोन हजार लसींचा वापर केला जातो, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्राप्त झालेल्या दहा हजार लसींचा साठा पाच दिवस पुरेल आणि एक लाख व्यक्तींना लस देणे शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group