‘या’ कुत्र्याला शोधण्यासाठी सात हजार डॉलर बक्षीस; विमान घेतले भाड्याने !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन | अमेरिकेतील कॅलिफोर्नियात सॅन फ्रॅन्सिसको येथे राहणाऱ्या एमिलीने जॅक्सन हा कुत्रा हरवला. त्याची माहिती देणाऱ्याला तिने पाच लाख रुपये बक्षीस घोषित केले असून त्याला शोधण्यासाठी विमानही भाड्याने घेतले आहे.

https://www.instagram.com/p/B6PXj6Ggx0J/?igshid=172l4i3acu9pu

एमिली गेल्या आठवड्यात एका किराणा दुकानात गेली होती त्यावेळी तिचा निळ्या डोळ्यांचा ऑस्ट्रेलियन शेफर्ड जातीचा तिचा कुत्रा कुणी तरी चोरून नेला. एमिलीने तिच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर याबाबतची माहिती (Bring Jackson Home) दिली.

जॅक्सनचे वजन १३ किलो आहे. अंगावर काळे- पांढरे, तपकिरी केस आहेत. त्याचे डोळे निळ्या रंगाचे आहेत. एमिलीने जॅक्सनच्या नावे ट्विटरवर अकाउंट बनवले आहे. तसेच या वेबसाईटवर Go Found me असे एक सेक्शन तयार करण्यात आले आहे. त्यात आतापर्यंत सात हजार रुपयांची रक्कम जमा झाली असून ही रक्कम ‘डॉग रेस्क्यू टीम’ला देण्यात येणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

धक्कादायक! गौतम गंभीरला कुटुंबासह ठार मारण्याची धमकी

महाविकासआघाडीचा हनिमून पिरीयड संपू द्या, मग बघू – राज ठाकरे

फडणवीस सरकारच्या काळात ६५ हजार कोटींचा घोळ; ‘कॅग’च्या अहवालातील माहिती

एल्गार परिषदेतील भाषणांवरुन त्यांना देशद्रोही ठरवणे हा सत्तेचा गैरवापर – शरद पवार

अजित हार्ड वर्कर, प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याची त्याच्यात क्षमता – शरद पवार

https://twitter.com/EmilieTalermo/status/1206004238192529409