Sunday, March 26, 2023

…म्हणून मी संघ सोडून शिवसैनिक झालो : शरद पोंक्षे

- Advertisement -

कल्याण | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडून बाळासाहेबांचा शिवसैनिक होण्याचे कारण सांगताना अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दंड चालवायला शिकवतात. पण मारायची वेळ आली की बौद्धिक घेतात. म्हणून आपल्याला ते पटत नाही. कल्याणमध्ये अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. हिंदुत्वाविषयी बोलताना पोंक्षे म्हणाले, “मराठी ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे, असे म्हटल्याने दुसऱ्या भाषांचा अपमान होत नाही. त्यामुळे ‘गर्व से कहो हम हिंदू है’, म्हटल्याने दुसऱ्या धर्माचा अपमान होत नाही.

सावरकर यांना वाचल्यानंतर असे लक्षात येते की, ज्या माणसाने जात हा शब्द संपुष्टात आणण्यासाठी आयुष्य झिजवले, त्याच माणसाला ब्राम्हण या तीन अक्षरामध्ये बंदिस्त करून टाकले आहे. आंबेडकर, फुले यांच्यापेक्षा सावरकर मला काकणभर श्रेष्ठ वाटतात. जे मला वाटते ते वाटते. कुणाला माझा पुतळा जाळायचा तर जाळा, असे ते म्हणाले. शिवरायांच्या हातात शस्त्र होते म्हणूनच ते अफजलखानाचा वध करू शकले. त्यामुळे गांधीजींच्या अहिंसा तत्त्वापेक्षा सावरकरांची तत्त्वे अधिक श्रेष्ठ होती, असेही पोंक्षे म्हणाले.

- Advertisement -