वेदांतनगरात सोन्याच्या दागिन्यांसह चार लाखांचा ऐवज लंपास

0
46
सोन्याच्या दागिन्यांसह चार लाखांचा ऐवज लंपास
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : वेदांतनगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी घुसून घरफोडी करीत ६२ ग्रॅम डायमंड, सोन्याचे दागिने आणि पाच हजार रोख रक्कम असा ऐवज लंपास केला आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी वेदांतनगर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेदांतनगर परिसरातील मनीष अपार्टमेंटमध्ये रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोर पावलांनी आत प्रवेश केला. त्यांनी फ्लॅट क्रमांक एक, दोन आणि तीन हे सलग घर फोडले आहे. यातील फ्लॅट क्रमांक एक आणि तीन रिकामे असल्याने चोरट्यांच्या हाथी काही ही लागले नाही. मात्र, निरुपमा शिवप्रकाश मुदिराज (वय ६५) यांचा फ्लॅट क्रमांक दोन हा चार जुलैपासून बंद असल्याने चोरट्यांनी घरात कुणीही नसल्याची संधी साधून कुलूप तोडून चोरटे आत घुसले. त्यांनी कपाटसह विविध ठिकाणाहुन चेन ब्रेसलेट आणि अंगठ्या असा सोन्याची दागिने चोरले. चोरट्यांनी एकूण ३ लाख ९१ हजारांचा माल लंपास केला.

रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती निरुपमा यांना दिली. हे कळताच या घटनेची माहिती वेदांतनगर पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक परमेश्वर रोडगे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. संध्याकाळी त्यांची मुलगी धनश्री मोदिराज (वय ३५) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here