#Tatastories : गोष्ट एका अशा महिलेची जिने टाटाच्या कंपनीला बुडण्यापासून वाचवण्यासाठी आपल्या मौल्यवान वस्तू विकल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । लेडी मेहेरबाई टाटा (Lady Meherbai Tata) यांची ही गोष्ट … ज्यांच्यामुळे टाटा स्टील (Tata Group) कंपनीला आज मान्यता मिळाली. बहुतेक लोकांना त्यांच्याविषयी हे देखील माहित नाही कि त्या व्यापकपणे पहिल्या भारतीय स्त्रीवादी प्रतिमांपैकी (first Indian feminist icons) एक मानल्या जातात. लेडी मेहेरबाई टाटा बाल विवाह संपुष्टात आणण्यापासून ते महिलांच्या मताधिकारापर्यंत आणि मुलींच्या शिक्षणापासून ते पडदा पद्धतीपासून दूर करण्यापर्यंतच्या सर्व गोष्टींसाठी परिचित आहेत. परंतु एवढेच नाही तर, देशातील सर्वात मोठी स्टील कंपनी टाटा स्टीलला वाचविण्यातील त्यांच्या योगदानाबद्दलही ते ओळखले जातात. योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊन त्यांनी टाटा स्टीलला बुडण्यापासून कसे वाचवले ते जाणून घेऊयात.

या पुस्तकात खुलासा केला आहे
टाटा स्टोरीज (#Tatastories) या आपल्या नवीन पुस्तकात हरीश भट यांनी लेडी मेहेरबाई टाटाने स्टीलच्या या दिग्गज कंपनीला कसे वाचवले ते सांगितले. जमशेदजी टाटांचा थोरला मुलगा सर दोराबजी टाटा यांनी लंडनमधील व्यापार्‍यांकडून पत्नी लेडी मेहरबाईसाठी 245.35 कॅरेट ज्युबिली हिरा खरेदी केला होता, तो कोहिनूर (105.6 कॅरेटचा कट) पेक्षा दुप्पट मोठा आहे. 1900 च्या दशकात याची किंमत सुमारे 100,000 डॉलर्स होती. हा मौल्यवान हिरा लेडी मेहेरबाईसाठी इतका खास होती की, त्यांनी तो खास प्रसंगी घालण्यासाठी ठेवला. पण 1924 मध्ये परिस्थिती अशी बदलली की लेडी मेहेरबाईंनी ते विकायचे ठरवले.

असे घडले की, त्यावेळी टाटा स्टीलसमोर रोखीची कमतरता होती आणि कंपनीतील कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठीही पैसे नव्हते. त्यावेळी लेडी मेहेरबाईंना कंपनीचे कर्मचारी आणि कंपनीला वाचविणे अधिक वाटले जयसाठी त्यांनी ज्युबिली डायमंडसह त्यांची संपूर्ण वैयक्तिक मालमत्ता इम्पेरियल बँकेकडे तारण ठेवली जेणेकरून टाटा स्टीलसाठी फंड उभा होईल. बऱ्याच दिवसानंतर कंपनीने रिटर्न देणे सुरू केले आणि परिस्थिती सुधारली. भट म्हणाले की,”तीव्र संघर्ष सुरू असताना देखील एकाही कामगारला कमी करण्यात आले नाही.”

लेडी मेहेरबाई टाटा कश्या होत्या ते जाणून घ्या
टाटा ग्रुपच्या मते सर दोराबजीने टाटा ट्रस्ट स्थापन करण्यासाठी सर दोराबजी टाटा यांच्या मृत्यूनंतर ज्युबिली हिरा विकला. 1929 मध्ये पार पडलेल्या शारदा कायद्यासाठी किंवा बालविवाह निषेध कायद्यासाठी ज्यांचा सल्ला घेण्यात आला त्यापैकी एक म्हणजे लेडी मेहेरबाई टाटा. त्यांनी त्यासाठी भारत तसेच परदेशातही सक्रियपणे प्रचार केला. नॅशनल काउंसिल फॉर वूमन आणि अखिल भारतीय महिला परिषदेतही त्यांचा सहभाग होता. 29 नोव्हेंबर 1927 रोजी लेडी मेहेरबाई यांनी मिशिगनमध्ये हिंदू विवाह विधेयकासाठी एक खटला दाखल केला. 1930 मध्ये अखिल भारतीय महिला परिषदेत त्यांनी महिलांना समान राजकीय दर्जा देण्याची मागणी केली. लेडी मेहेरबाई टाटा हे भारतातील फेडरेशन ऑफ इंडियन वुमन लीगच्या अध्यक्षा आणि बॉम्बे प्रेसीडेंसी महिला परिषदेच्या संस्थापकांपैकी एक होत्या. लेडी मेहेरबाई यांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत भारताचा समावेश होता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment