जालना । महावितरणने कृषीपंपाची वीजतोडणी मोहीम सुरू केली आहे.यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच अतिवृष्टीमुळे शेतकरी बेचिराख झाला आहे.त्यात महावितरणच्या आडमुठेपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.ही मोहीम तात्काळ थांबवा,अशी मागणी युवासेनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हंटले आहे की,सध्या शेतकऱ्यांवर अस्मानी व सुलतानी संकट आले आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही.यातून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे.यात महावितरणने आडमुठी भूमिका घेत सक्तीची वीजबिल वसुली सुरू केली आहे.अनेक शेतकऱ्यांच्या डीपी या नादुरुस्त झाल्या आहेत.त्यांना त्या दुरुस्ती करून देण्यासाठी सक्तीची वीजबिल वसुली सुरू आहे.
वीजबिल न भरल्यास त्या शेतकऱ्यांना डीपी मिळत नाही.सध्या शेतमालाला पाणी असून वीज नसल्याने पाणी देता येत नाही.शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान सुद्धा त्यांच्या खात्यात जमा झाले नाही.या निवेदनावर युवासेनेचे बंटीसेठ आटोळे,साष्टपिंपळगावचे विभाग प्रमुख रजनीश कनके,रमेश काळे,सुशांत गांगुर्डे,राहुल हार्दिक,सचिन देवकाते,राहुल हारे याच्या स्वाक्षरी आहेत.