शहिद होण्याकरता ताकद देणाऱ्या तिरंग्याची गोष्ट…

0
66
story of indian flag
story of indian flag
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्वातंत्र्य दिन विशेष । सर्व स्वतंत्र देशांना स्वत:चा असा झेंडा असतो. झेंडा असणं हे स्वतंत्र असण्याचे प्रतिक मानले जाते. झेंड्यासाठी लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली असते. झेंडाच जगायला प्रेरणा आणि गरज पडली तर शहिद होण्याकरता ताकद देत असतो. तशीच गोष्ट आहे आपल्या तिरंग्याची. भारताचा सध्याचा झेंडा, आपणा सर्वांच्या स्वातंत्र्याचं प्रतिक असलेला तिरंगा २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेत पारीत करण्यात आला. १५ आॅगस्ट १९४७ रोजी तो भारतभर झळकला. तर असा हा आपला तिरंग्याचा इतिहास काय आहे? त्याच्या तिन रंगांचा अर्थ काय आहे? ते आपण पाहुयात.

इतर महत्वाचे –

क्रांतिसिंह नाना पाटील

क्या आप इंडिया का झंडा फाड दोगे ? पाकिस्तानात अजब युट्यूब प्रैक

तिरंग्यातील रंगांचा अर्थ –
तिरंग्या सर्वात वरती केशरी, मधे पांढरा आणि खाली गर्द हिरवा रंग वापरण्यात आला आहे. यातील केशरी रंग धाडस आणि बळ याचं प्रतिक आहे. पांढरा रंग शांतता आणि सत्याचे प्रतिक आहे. तर गर्द हिरवा रंग सुपिकता, प्रगती इत्यादीचे प्रतिक आहे.

अशोक चक्र –
तिरंग्यात पांढर्या रंगाच्या मधोमध एक चक्र वापरण्यात आले आहे. हे धर्म चक्र इसवी सन पूर्व तिसर्या शतकातील अशोका साम्राज्यात कायद्याचे प्रतिक मानले जात होते. तिरंग्यातील हे चक्र क्रियाशिलतेत जीवण आहे आणि स्थिरतेत मृत्यू हे प्रतित करते.

कोणताही भारतीय नागरीक तिरंगा फडकावू शकतो
२६ जानेवारी २००२ साला पासून तिरंगा कोणाहाही भारतीय नागरीकाला आपल्या घरावर, आॅफिसमधे, कारखाना – दुकाने, कंपनी आदी ठिकाणी फडकावण्यास परवानगी देण्यात आली आहे. केवळ राष्ट्रीय दिवसालाच नव्हे तर वर्षभरातील कोणत्याही दिवशी किणताही भारतीय नागरीक राष्ट्रीय ध्वज फडकावू शकतो. मात्र त्यासाठी एक नियमावली बनवण्यात आली असून फ्लॅग कोड २००२ पारीत करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here