हटके स्टाईल : आ. शिवेंद्रसिंहराजें भोसले यांनी हातात घेतले “जेसीबी स्टेअरिंग”

0
82
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहरात छ. खा. उदयनराजे हे नेहमीच आपल्या हटके स्टाईलसाठी चर्चेत असतात. मात्र, आता त्यांचे बंधू व राजकीय विरोधक असलेले छ. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही आपली हटके स्टाईल दाखवत, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या शुभारंभ स्वतः जेसीबी चालवत केला. येथील कामाचा शुभारंभ करताना जेसीबीने खोदकाम आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.

सातारा शहरातील गोडोली जकात नाका ते अजंठा हॉटेल परिसरातील रहिवाशांना आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नाने नवीन पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनच्या कामाचा शुभारंभ आज शनिवार दि. 25 रोजी सकाळी करण्यात आला. यावेळी चक्क शिवेंद्रराजे भोसले यांनी जेसीबी चालवला. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग सातारा अधिकारी यांच्यासह शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक फिरोज पठाण आणि इतर मान्यवर नगरसेवक उपस्थित होते.

सातारा नगरपालिकेचा पंचवार्षिक कार्यकाल उद्या संपणार असून येणाऱ्या काही दिवसात निवडणुकीच्या बिगुल केव्हाही वाजू शकतो. त्यामुळे सातारा नगर विकास आघाडी व सातारा विकास आघाडी दोन्ही गटाकडून विकास कामांचे शुभारंभ करण्यात आले आहेत. आज आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडूनही पिण्याच्या पाण्याचा पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here