त्या 7 आमदारांविरोधात काँग्रेस करणार कठोर कारवाई; क्रॉस वोटिंग करणे पडणार महागात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीनंतर नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुका (Assembly Election) पार पडल्या. या निवडणुकीत 12 उमेदवारांपैकी शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला. तर दुसऱ्या बाजूला निवडणुकीवेळी काँग्रेसची (Congress) मते फुटली. या फुटीर आमदारांच्याविरोधातच आता काँग्रेस कठोर पाऊल उचलणार आहे. विधान परिषदेच्या मतदानावर ज्या ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केले अशा आमदारांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात येणार आहे.

सूत्रांकडून माहिती आली आहे की, विधान परिषदेच्या निवडणूकीत जे आमदार फुटले त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. समोर आलेल्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केले होते. आता याच आमदारांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी फुटलेल्या आमदारांची नावे दिल्ली हायकमांडकडे पाठवण्यात आली आहेत.

दरम्यान, यंदाच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये एकूण 11 जागांसाठी राजकीय पक्षांचे 12 उमेदवार रिंगणात उतरले होते. या 12 उमेदवारांमध्ये महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले. तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव या विजयी झाल्या. तसेच ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले. परंतु शेकापचे जयंत पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. तसेच या निवडणुकीमध्ये काही मते देखील फुटली. सांगितले जात आहे की, निवडणुकीवेळी काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांनी भाजप आणि अजित पवार गटाला मते दिली. अन्यथा या निवडणुकीमध्ये देखील काँग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्या असत्या.