Tuesday, June 6, 2023

शहरातील महत्वाच्या मशीदी जवळ ईद निमित्त आज सकाळपासूनच पोलिसांचा कडक बंदोबस्त…

 

औरंगाबाद | शहरांमधील असलेल्या मुख्य भागातील मशिदी समोर पोलिस प्रशासनाच्या तुकड्या तैनात आहे. प्रशासनाच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की ईद आपण घरातच बसून साजरी करा. शासनाचे दिलेले नियम पाळून आपण ईद साजरी करा. यावेळची ईद आपण आपल्या परीवारा सोबत घरात राहून साजरी करा. असे शासनाकडून निर्देश देण्यात आले आहे.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून दक्षता घेण्यात येत आहे. आज सकाळी सहा वाजेपासून शहरांमधील मुख्य चौकात तसेच मशिदी समोर पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावताना दिसून आला आहे.