धुळे प्रतिनिधी । धुळे बस स्थानकात प्रवासी सुविधा उपलब्ध होण्याकरीता पाच मागणीचे लेखी निवेदन विभाग नियंञकांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देण्यात आले.
याबाबत माहिती की , धुळे शहराच्या मध्यवर्ती भागात बस स्थानक आहे . प्रवासी यांना मुलभूत सुविधा मिळत नाही . यात बस स्थानक आवारात पार्कींगची सुविधा उपलब्ध व्हावी. ज्या ठिकाणी पार्कींग सुविधा आहे. ते रस्त्यावर मोठे खड्डे आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे . रस्त्यावर डांबरी करण न झाल्याने आवारात बस ये – जा करते वेळी धुळीच्या साम्राज्यामुळे मोठा ञास होतो. बस स्थानकातील आवारात चालकांचे निवास स्थान आहे. तेथील ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर आणि प्रवाश्यांच्या देखील अंगावर पडते. आवारात दुषित पाणी , सांडपाणी साचल्याने दुर्गंधी होते.
या मागण्यांसह अन्य मागण्या त्वरीत मंजुर व्हाव्यात या करीता विभाग नियंञिका मनिषा सपकाळ यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष वतीने लेखी निवेदन देताना कॉ.हिरालाल सापे,पोपट चौधरी,कॉ.रमेश पारोळेकर,साहेबराव पाटील मदन परदेशी आदींनी दिले आहे. सदर निवेदनाचा गांभिर्याने विचार न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याला सर्वस्वी जवाबदार प्रशासन असेल असा इशारा देण्यात आला.