Hat’s Off महाराज : छ. उदयनराजेंच्या नव्या व्हिडिओला जोरदार कमेंट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले हे त्याच्या हटके स्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असतात. कॉलर उडवणे, बाईकची सुसाट चालविणे तर सिनेमाच्या गाण्यावर कॉलर उडविणे, तरूणाईसोबत ठेका धरलेले असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. मात्र आता उदयनराजे चर्चेत आले ते एका भावनिक व्हिडिओमुळे, ज्यात एका चिमुकली अभ्यासासाठी लागणारे कागदी तक्ते (पोस्टर्सस) सर्वच्या सर्व विकत घेतले आहेत. उदयनराजेच्या या व्हिडिओला “हॅट्स ऑफ (Hat’s Off) महाराज” अशा कमेंट मिळत आहेत.

उदयनराजे आपल्या कारमधून प्रवास करत होते. यावेळी एका पेट्रोलपंपावर एक चिमुकली पुस्तके विकत उभी होती. या चिमुकलीने उदयनराजेंच्या गाडीजवळ जावून पुस्तके खरेदी करण्याची विनंती केली. यावेळी राजेंनी या चिमुकलीकडील सर्वच पुस्तके विकत घेतली.

शहरात ट्रॅफिक सिग्नलच्या ठिकाणी तसेच टोलनाका असेल अशा ठिकाणी अशी लहान मुले भूक भागविण्यासाठी काहीना काही वस्तू विकत असतात. साताऱ्याचे खा. छ. उदयनराजे भोसले हे गोरगरीब लोकांच्या मदतीबद्दल सुध्दा प्रसिद्ध आहेत. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात ते रस्त्यावर एका फळांचे तक्ते विकणा-या मुलीकडून तक्ते विकत घेताना दिसून येत आहेत. सध्या सोशल मीडियावर छ. उदयनराजे आणि चिमुकलीचा भावनिक  व्हिडिओ चांगलाच चर्चेत आलेला आहे.