Wednesday, February 8, 2023

सातारा जिल्ह्यात उद्यापासून कडक लाॅकडाऊनची शक्यता? जिल्हाप्रशासन आणि लोकप्रतिनिधीची बैठक सुरू 

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित दोन हजारांच्यावरती सापडत आहेत. कोरोनाचा पाॅझिटीव्हचा दर वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यदरही वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेवरील वाढणारा ताण कमी करण्यासाठी सातारा येथे जिल्ह्यातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत अत्यावश्यक सेवाही बंद ठेवून कडक लाॅकडाऊन लावण्याचा विचार सुरू आहे. कदाचित उद्यापासून (दि.4 मे) कडक लाॅकडाऊन लावण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

- Advertisement -

सातारा येथे शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हाप्रशासनाची महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आ. शशिकांत शिंदे, प्रभारी जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलिस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अंचल दलाल यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित आहे.

गेल्या काही दिवसांपासून लाॅकडाऊन लावण्यात आले आहे. मात्र कडक लाॅकडाऊन नसल्याने अनेकजण वेगवेगळी कारणे सांगून घराबाहेर पडत आहेत. अशावेळी पोलिस व प्रशासन यांना लोकांची कारणे सांगून कारवाई करण्यास अडचणी येत आहेत. लोकांच्या बेफिकीरपणा व कोरोनाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाप्रशासन व लोकप्रतिनिधीं हे उद्यापासून (दि. 4 मे) कडक लाॅकडाऊन लावण्याचा विचार करत आहेत.

सायंकाळी 4 वाजेपर्यंत बैठक संपल्यानंतर नक्की कडक लाॅकडाऊन लावण्यात येणार का हे समजू शकणार आहे. परंतु सध्या बैठकीत अनेकजण हे कडक लाॅकडाऊन लावण्याची मागणी करत आहेत. तेव्हा लवकरच सातारा जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन लावण्याची शक्यता आहे, असे समजते.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा👉🏽 https://chat.whatsapp.com/BDEczHhWtFN5weC7grjMZK