हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडिया आणि इंग्लड यांच्यात सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यामध्ये Stuart Broad ने शनिवारी एक नवा विक्रम रचला आहे. या सामन्यात मोहम्मद शमीची विकेट घेत ब्रॉडने 550 बळी पूर्ण केले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये असा टप्पा गाठणारा Stuart Broad हा जगातील फक्त सहावाच गोलंदाज ठरला आहे. तर इंग्लंडसाठी अशी कामगिरी करणारा तो दुसराच खेळाडू आहे. हे जाणून घ्या कि, ब्रॉडच्या आधी जेम्स अँडरसनने अशी कामगिरी केली आहे. अँडरसनने 172 कसोटीत खेळताना 656 विकेट्स तर ब्रॉडने 156 कसोटीत खेळताना 550 विकेट्स घेतले आहेत.
36 वर्षीय Stuart Broad ने कसोटी क्रिकेटमध्ये 19 वेळा 5 तर 3 वेळा 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. 15 धावांत 8 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. फलंदाजी बाबत बोलायचे झाल्यास त्याने आतापर्यंत 18 च्या सरासरीने 3472 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि 13 अर्धशतके देखील झळकावली आहेत. तसेच 169 धावांची सर्वोत्तम खेळी केली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या लिस्टमध्ये श्रीलंकेचा माजी ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन पहिल्या स्थानावर आहे. त्याने कसोटीत 800 बळी घेतले आहेत. यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्नने 708, भारताचा माजी लेगस्पिनर अनिल कुंबळेने 619 आणि ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने 563 विकेट्स घेतल्या आहेत.
Stuart Broad आता मॅकग्राच्या विक्रमापासून फक्त 13 विकेट्स दूर आहे. अशा परिस्थितीत ब्रॉड कडून लवकरच हा विक्रम मोडला जाऊ शकेल. मात्र, या कसोटीत त्याने एक लाजिरवाणा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. या सामन्यात त्याच्या एका षटकात बुमराहने 35 धावा ठोकल्या आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात महागडे षटक ठरले आहे.
Stuart Broad च्या मर्यादित षटकांच्या सामन्याबाबत बोलायचे झाले तर त्याने 121 वनडेत 178 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये 23 धावांत 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याच वेळी, त्याने 56 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 65 विकेट्स देखील घेतल्या आहेत. भारताचा माजी दिग्गज युवराज सिंगने T20 मध्ये ब्रॉडच्या एका षटकात 6 षटकार ठोकले आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.cricbuzz.com/profiles/554/stuart-broad
हे पण वाचा :
LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 73 रुपये जमा करून मिळवा 10 लाख रुपये !!!
UPI द्वारे होणारी फसवणूक कशी टाळावी ??? अशा प्रकारे समजून घ्या
Yes Bank चे कर्ज महागले, बँकेकडून MCLR मध्ये करण्यात आली वाढ !!!
Share Market ची वाटचाल पुढील आठवड्यात कशी असेल ??? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
Jio च्या 22 रुपयांच्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार महिनाभर इंटरनेट !!!