पौड प्रतिनिधी |मुळशी धरण पाहण्यासाठी गेलेल्या भरती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे हे तिन्ही विद्यार्थी महाराष्ट्रा बाहेरचे आहेत. तर या मृतांमध्ये २ मुलांचा आणि एका मुलीचा समावेश आहे.
Pune: Three students of Bharti University drowned in the Mulshi Dam today morning. The deceased have been identified as Sangita Negi, Shubham Raj Sinha and Shiv Kumar. Police have recovered the body of the woman while the search for the other two is still underway. #Maharashtra
— ANI (@ANI) May 2, 2019
आज गुरुवारी सकाळी ७ वाजता हे विद्यार्थी धरण परिसरात सहलीसाठी गेले होते. वळणे गावाजवळ हे सर्व पोहण्यासाठी धरणात उतरले असता हा प्रसंग घडला आहे. या याबाबत पौड पोलीसांना माहिती मिळताच पौड पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. त्यानंतर घटना स्थळी आपत्ती व्यवस्थापनाचे पथक पाचारण करून मृत देह पाण्यातून वर काढण्यात आले.
संगीता नेगी (कोथरुड, मुळ दिल्ली), शुभम राज सिन्हा (वय. २२, मुळ पटना बिहार), शिवकुमार (वय २१, रा. मुळ उत्तरप्रदेश) अशी मृत विदयार्थ्यांची नावे आहेत. त्याच प्रमाणे हे सर्व भारती विद्यापीठाचे एमबीएचे विद्यार्थी आहेत.