आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच पाण्यातून विषबाधेने विद्यार्थिनीचा मृत्यू

0
99
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याच मतदारसंघात दहावी च्या विद्यार्थिनीचा पाण्यातून विषबाधा झाल्याने मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील शिरटी इथल्या शिरटी हायस्कूल मध्ये पाण्यातून विषबाधा झालेल्या दहावीच्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. १६ वर्षीय सानिका नामदेव माळी असं तिचे नाव आहे.

या प्रकरणाची फिर्याद तिचे वडील मनोहर माळी यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान संतप्त नातेवाईकांनी सानिकाचा मृतदेह तब्बल ४ तास हायस्कूल समोर ठेवला होता. या प्रकरणाची कसून चौकशी करावी, दोषींवर कडक कारवाई करावी अश्या मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here