भर रस्त्यात भांडण सुरु असणाऱ्या तरुणांना भरधाव होंडा सिटी कारची जोरदार धडक

Accsident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर आपण अनेकदा विद्यार्थ्यांच्या भांडणाचे (student fighting on road) व्हिडिओ व्हायरल होताना पाहिले असेल. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ उत्तर प्रदेश मधील मसूरी येथील असून तो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बीबीए आणि बीसीए कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार राडा (student fighting on road) सुरू असल्याचा असून, सीनियर ज्युनिअर असल्यावरून विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर त्याचे रूपांतर भांडणात झाले.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो रस्त्यावर काही तरुण भांडतात (student fighting on road) आणि विद्यार्थ्यांचा घोळकाही उभा आहे. इतक्यात पांढऱ्या रंगाची होंडा सिटी भरधाव वेगाने (honda city car) रस्त्यावरून येते ते पाहून रस्त्यावरची मुले बाजूला होतात. पण त्यातील दोन मुलांना ही भरधाव होंडा सिटी येताना दिसत नाही. इतक्यात या होंडा सिटी ची धडक इतकी भीषण या दोघांना बसते की, मुले थेट गाडीच्या काचेवर आदळतात आणि रस्त्यावर जाऊन कोसळतात. त्यानंतर होंडा सिटी( honda city car) पुढे जाऊन थोड्या अंतरावर थांबते मात्र इतकेच नाही यानंतर एक विचित्र गोष्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो.

ज्या विद्यार्थ्यांना या गाडीने धडक दिली आहे ते कोसळलेले दोघेही विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उठून उभे राहतात आणि मारामारी करायला सुरुवात करतात. पोलिसांकडून या व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पोलिसांनी रस्त्यावर राडा करणाऱ्या मुलांवर कारवाई केली. त्याचबरोबर होंडा सिटी कार ( honda city car) ही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय