नाशिक प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा निवडणूक यंत्रणा मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे. जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु आहे. यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा. यासाठी मालेगाव येथील नाना मुंदडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करुन लोकांना मतदान करण्याच आवाहन केले. यावेळी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
जागृत मतदार हे देशाचे भविष्य असल्यान मतदार जागृतीसाठी मोठी व्यवस्था आपल्याला करावी लागेल. मतदार स्वयंप्रेरणेने मतदान करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत आला पाहिजे. यासाठी प्रशासकीय पातळीवर मतदार जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपला इच्छित लोकप्रतिनिधी निवडून देण्याची संधी मतदारांना दर पाच वर्षांनी मिळते. या संधीचा फायदा सर्व मतदारांनी घ्यावा. असं आवाहन यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आलं.
तालुकास्तरावर नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत मतदारांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट कसे वापरावे, याबद्दल सर्व मतदारांना माहिती देऊन मतदांनाबद्दल मतदारांमध्ये जागृकता निर्माण व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
इतर काही बातम्या-
‘मतदानातील नोटा पर्याय लोकशाहीला घातक’ – चंद्रकांत पाटील
वाचा सविस्तर – https://t.co/OAryb3w1ji@ChDadaPatil @BJP4Maharashtra @CMOMaharashtra @BJPLive @INCMumbai @INCPuneMahila #vidhansabha2019#MaharashtraElections2019 #NOTA
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 8, 2019
मतदान केंद्र शोधताय? गूगल करा..
वाचा सविस्तर – https://t.co/X4caqNSGI6@1947democracy @PMOIndia @indianelection1 #ElectionCommission #Elections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 8, 2019
‘या’ गावात नेत्यांना, अधिकार्यांना गावबंदी, देशात बुलेट ट्रेन झाली पण आमच्या गावात रस्ता नाही असा आरोप@NCPspeaks @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @PMOIndia @NCPpbn https://t.co/9hLfN01Guk
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 6, 2019