जिल्हा परिषद शाळेची मुले खूपच हुशार…साताऱ्यातील ‘या’ शाळेतील मुले बोलतायत चक्क जपानी भाषा

Students School News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो पिल्याशिवाय कोणीही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, अशी म्हण आहे. ही म्हण सातारा जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्याबाबतीत तंतोतंत लागू होते. कारण सातारा जिल्ह्यातील विजयनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुले सध्या जपानी भाषा बोलत आहेत. विजयनगर शाळेतील शिक्षक बालाजी जाधव यांनी एक प्रयोग केला असून त्यांनी मुलांना जपानी भाषा शिकवली आहे. शाळेतील पहिली ते चौथीच्या वर्गातील मुले एकमेकांसोबत जपानी भाषेत संवादही साधत आहेत.

विजयनगरच्या शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग आहेत. शाळेतील विद्यार्थी प्रामुख्याने गरीब कुटुंबातील असल्याने ते शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जाऊ शकतात याचा विचार करून शिक्षक बालाजी जाधव यांनी प्रत्यक्ष शिकवण्याला प्राधान्य दिले. विजयनगर शाळेचे कल्पक शिक्षक बालाजी जाधव यांनी त्यांच्या शाळेत एक अभिनव असा प्रयोग राबविला आहे. त्यांनी या शाळेतील पहिली ते चौथीच्या वर्गातील 40 विद्यार्थ्याना जपानी भाषा शिकवली आहे.

अगदी काही महिन्यांतच विद्यार्थी जपानी भाषेत वाचन, लेखन, गणिते व दैनंदिन संवाद साधण्यात कुशल झाले आहेत. शिक्षक जाधव यांनी सुरुवातीला 2 ते 3 आठवडे विद्यार्थ्यांना युट्युब वरील जपानी भाषेचे व्हिडिओ दाखविले. त्यानंतर त्यांना अंक, शब्द यांची माहिती शिक्षक जाधव यांनी करून दिली आहे.

https://www.facebook.com/watch/?v=9030696273667538&extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=l2pjGR&ref=sharing

प्राथमिक गोष्टी समजू लागल्यावर जपानी भाषेतील संवाद दाखविण्यात आले. जपानी भाषेत तीन प्रकारच्या लिपी असतात. त्यातील हिरागाना नावाची लिपी विद्यार्थ्यांना शिकवण्यात आली. विशेष म्हणजे इयत्ता पहिलीचे विद्यार्थी जपानी भाषा अगदी सहजतेने शिकले. दोन महिन्यांत अक्षरे, अंक, वाचन, लेखन व संवाद या सर्व बाबी चांगल्या प्रकारे शिकविण्यात आल्या.

विद्यार्थी साधू शकतात जपानी लोकांशी संवाद

जपानी भाषेत प्राणी, पक्षी, वार, महिने, फळे, फुले, नातेवाईक, कृती, दैनंदिन शब्द व वाक्य वाचन, बोलणे हे सहजपणे करता येऊ लागले. साधारण 4 महिन्यांचा या सर्व बाबी शिकण्यास वेळ लागला. जपानी भाषा विजयनगर शाळेच्या विद्यार्थ्यांना समजू शकत असल्याने जपानी लोकांशी ते संवाद साधू शकतात.