पेन्शनधारकांना अशा प्रकारे सादर करता येईल Life Certificate !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Life Certificate : पेन्शनधारकांसाठी आजची आपली बातमी महत्वाची ठरेल. पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन सुरू ठेवण्यासाठी त्यांचे वार्षिक लाइफ सर्टिफिकेट नोव्हेंबरमध्ये सादर करणे आवश्यक आहे. मात्र, केंद्र सरकारकडून 80 वर्षे आणि त्याहून जास्त वयोगटातील सुपर सीनियर पेन्शनधारकांना दरवर्षी 1 नोव्हेंबर ऐवजी 1 ऑक्टोबरपासूनच वार्षिक लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याची परवानगी दिली जाते.

Pensioners' life certificates to be collected from their doorstep: Govt - The Week

पेन्शनधारकांसाठी Life Certificate हे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. कारण पेन्शन कोणत्याही व्यत्ययाशिवाय मिळवण्यासाठी लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागते. लाइफ सर्टिफिकेटद्वारे संबंधित पेन्शनधारक जिवंत आहे की नाही याची माहिती कळते.हे लक्षात घ्या कि, लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. चला तर त्याविषयी जाणून घेउयात…

Pensioner's Life Certificate and Jeevan Pramaan Certificate

पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने सांगितले की, आता पेन्शनधारकांना बँकांच्या डोअरस्टेप बँकिंग अलायन्स किंवा पोस्ट विभागाच्या डोअरस्टेप सर्व्हिसचा वापर करून डिजिटल Life Certificate सादर करता येतील. डोअरस्टेप बँकिंग अलायन्स ही सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांमधील युती आहे, ज्यामध्ये बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक यांचा समावेश आहे.

Life Certificate स्वतः ऑनलाइन देखील तयार करता येते. त्यासाठी लाइफ सर्टिफिकेट पोर्टल https://jeevanpramaan.gov.in/ वरून डिजिटल पद्धतीने लाइफ सर्टिफिकेट तयार करता येईल. तसेच आधार बेस्ड ऑथेंटिफिकेशनद्वारे देखील डिजिटल सर्टिफिकेट तयार केले जाऊ शकते.

Pensioners can now submit life certificates without visiting bank, post office- Here's how

तसेच वेबसाइट ( http://doorstepbanks.com किंवा http://www.dsb.imfast.co.in/doorstep/login) किंवा डोअरस्टेप बँकिंग, मोबाइल ऍप किंवा टोल-फ्री नंबर (18001213721 किंवा 18001037188) वर कॉल करून बँकेच्या डोअरस्टेप सर्व्हिससाठी बुकिंग करता येईल.

मात्र जर आपल्याला Life Certificate डिजिटल पद्धतीने सादर करता येत नसेल तर आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन ते जमा करता येईल.

हे पण वाचा :
गेल्या एका महिन्यात ‘या’ Multibagger Stock ने दिला 251% रिटर्न !!!
Union Bank of India कडून ग्राहकांना धक्का !!! MCLR आधारित कर्ज दरात केला बदल
Oral Health Foundation च्या माध्यमातून 300 रुग्णांची मोफत दंत तपासणी ; भानुशाली परिवाराचा स्तुत्य उपक्रम
Train Cancelled : रेल्वेकडून 128 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today : सणासुदीच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण, नवीन दर पहा