बीडमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – राज्यात अपघांताचे (accident) सत्र सुरूच आहे. बीडमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीड बायपास वरील छत्रपती संभाजी महाराज चौकात काल दुपारी एक भीषण अपघात (accident) झाला. यामध्ये एका भरधाव ट्रकने दुचाकीवरून कामाला जाणाऱ्या 2 बांधकाम कामगारांना चिरडले. या भीषण अपघातात (accident) बांधकाम मिस्त्रीसह एक कामगार महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

अनिता भारत सरपते आणि कालिदास विठ्ठल जाधव अशी या अपघातात (accident) मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. अनिता सरपते या बिगारी काम करत तर कालिदास जाधव हे बांधकाम मिस्त्री होते. ते दोघे आपल्या कामानिमित्त दुचाकीवरून मांजरसुंबाकडे जात होते. यादरम्यान गेवराईकडे जाणाऱ्या भरधाव डंबरने यांच्या दुचाकीला जोरदार धडक (accident) दिली. हि धडक एवढी भीषण होती कि या दोघांचा जागीच मुत्यू झाला.

अनिता सरपते यांचा मृतदेह गाडीखाली अडकला होता. अखेर क्रेनद्वारे तो बाहेर काढण्यात आला. हा अपघात (accident) इतका भीषण होता कि यामध्ये दुचाकीचा चक्काचूर झाला. यावेळी या दोघांच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे वातावरण सुन्न झाले होते. मृत अनिता या बीडच्या धानोरा रोड येथील गोविंदनगरच्या रहिवासी होत्या. तर कालिदास जाधव हे केज येथील शेलगाल गांजीचे रहिवासे होते.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती