कुडाळ | जावळी सारख्या दुर्गम असणाऱ्या तालुक्यातील कुडाळ येथील आरिष इम्तियाज मुजावर याने दिग्दर्शित केलेल्या आर. जे. केराबाई या इंग्रजी डॉक्युमेंटरीची झी प्लस इंटरटेनमेंट शॉर्ट फिल्म फेस्टिवल 2021 मध्ये राष्ट्रीय अवॉर्डसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशाने कष्ट आणि मेहनतीच्या बळावर यशाचे उत्तुंग शिखर निश्चितच सर करता येते, असा प्रेरणादायी संदेश आजच्या युवा पिढीला मिळाला आहे.
झी प्लस इंटरटेनमेंट शॉर्ट फिल्म फेस्टिवल साठी एकूण 11 लघुचित्रपट व संपूर्ण देशभरातून दोन डॉक्युमेंटरी फिल्म यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये जावळी तालुक्यातील कुडाळ येथील आरिश मुजावर यांची डॉक्युमेंटरी आर जे केराबाईची नॅशनल अवॉर्ड साठी निवड करण्यात आली आहे.
अरीश मुजावर सध्या पुणे येथील MIT कॉलेज मध्ये मास मीडिया कम्युनिकेशन अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे.हा पुरस्कार सातारा जिल्ह्याला मिळालेला मनाचा पुरस्कार म्हणून मानला जात आहे. या यशाबद्दल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले त्याचबरोबर आमदार शशिकांत शिंदे सातारा जिल्हा पत्रकार संघ ,जावळी तालुका पत्रकार संघ,उपसभापती सौरभ शिंदे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.