हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्याचं कुठल्याही खेळाडूचं स्वप्न असतं, त्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते. आयपीएलच्या १३ व्या हंगामात कोलकाता कडून चमकदार कामगिरी करणाऱ्या वरून चक्रवर्ती चा भारतीय संघात स्थान मिळाले आहे. पण त्याचा प्रवास खूप आगळा वेगळा आहे.
कर्नाटकातील बिदर या शहरात राहणारा मध्यमवर्गीय वरून चक्रवर्ती वयाच्या १३ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यांने हा प्रवास वयाच्या १७ व्या वर्षापर्यंत केला. जिल्हा स्तरावर खेळायला मिळणार नसल्याने त्याने क्रिकेट सोडलं. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने आर्किटेक ची पदवी घेतली आणि तो नोकरी करू लागला. पण क्रिकेटचे वेड काही डोक्यातून जाईना. कंपनीला तशी त्याने विनंती केली आणि कंपनीने त्याला सराव करण्याची संधी दिली. या संधीचे सोने करत तो नोकरी आणि सराव असा दुहेरी संघर्ष तो करू लागला.
त्याच काळात त्याला तामिळनाडू कडून विजय हजारे ट्राफित खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने त्याचं सोनं केलं. ९ सामन्यात २२ विकेट घेत त्याने आपले क्रिकेटवरील प्रेम दाखवून दिले. याच कामगिरीच्या आधारावर त्याला 2017 च्या आयपीएल हंगामात पंजाबने ८ कोटी रुपयांची बोली लावली. पण पण तो काही प्रभाव दाखवू शकला नाही. त्यानंतर कोलकत्ता संघाने गेल्या हंगामात त्याला घेतले. गेल्या हंगामात त्याला संधी मिळाली नाही. आणि या वर्षी भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज कुलदीप यादव पहिल्या दोन सामन्यात चांगली कामगिरी करू न शकल्याने याला संधी मिळाली. या संधीवर स्वार होत त्याने सर्वांना चकित केले आणि ११ सामन्यात १३ विकेट घेतल्या.
दिल्ली विरुद्धच्या सामन्यात तर त्याने ५ विकेट घेऊन आपली उपयुक्तता सिद्ध केली.
त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर निवड समितीने नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ट्वेंटी ट्वेंटी संघात निवड केली. भारतीय संघातून खेळताना त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’