हॅलो महाराष्ट्र | विशेष प्रतिनिधी
शाहरुख खानचा रईस चित्रपटातला प्रसिद्ध डायलॉग आहे ” कोई भी धंदा छोटा या बडा नहीं होता और धंदे से बडा कोई धर्म नहीं होता.याचीच प्रचिती बऱ्याच व्यावसायिक लोकांच्या बाबतीत आपल्याला येत असते.असाच काहीसा विषय आहे तो कमलेश पटेल यांचा.
कमलेश हे मूळचे राजस्थान मधले. लहानपणापासूनच अभ्यासात गती. पण शिक्षणाच्या सोयी सुविधा गावापासून बऱ्याच लांब. तरीही अभ्यासाची आवड आणि शिक्षणाची ओढ त्यांना काही शांत बसू देत नव्हती.त्यातूनच त्यांनी गावात राहत कशीबशी शालेय शिक्षणाची वर्ष पूर्ण केली.चांगले मार्क्स मिळाले म्हणून कॉलेजला ॲडमिशन घेतले. तिकडेही अभ्यासात बरीच प्रगती केली.म्हणून राजस्थानात एका विद्यापीठात बी.ए.ला ॲडमिशन घेतलं.
कमलेश यांच्या घरची मंडळी तशी अशिक्षित म्हणून बारावी झाल्यावर त्यांनी पोराचं लग्न करू म्हणून मुलगी बघायला सुरवात केली होती आणि बी.ए.च्या तिसऱ्या वर्षाला कमलेशच लग्न झालं त्यामुळे शेवटच्या वर्षाचे पेपर्स राहिले इकडे जबाबदाऱ्या वाढल्या म्हणून व्यवसाय करण्याचं कमलेश यांनी ठरवल.आणि थेट मुंबई अर्थात मायानगरी या शहराला गाठलं.तिकडं मिळेल ते काम केलं. शेवटी एका मित्राच्या ओळखीने भायखळ्यात चहाच्या दुकानाला जागा उपलब्ध झाली आणि गेल्या दहा वर्षांपासून कमलेश अगदी आनंदाने चहाचा व्यवसाय करतायेत.
आपल्याला पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं होतं पण घराच्या जबाबदाऱ्यामुळे ते शक्य झालं नाही पण मोठ्या मुलाला मात्र आपण प्रचंड शिकवून मोठा अधिकारी बनवू अशी इच्छा ते व्यक्त करतात.आणि बऱ्याच लोकांना स्वतःची ओळख सांगताना भाई मैं बी.ए.चायवाला हुं असंही अभिमानाने सांगतात.