हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अधिकारी झाल्यानंतरही काहीजणांना पुढे जाऊन अजून मोठं अधिकारी व्हावंसं वाटत असत. अशीच मनात इच्छा असलेल्या गुजरातमधील कार्तिक जीवाणी यांनी धाडस करत IPS ची ट्रेनिंग अर्धवट सोडून कार्तिक असा झाला IAS पदाची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले. पाहूया कार्तिक यांच्या धाडसाची यशोगाथा…
आयएएस अधिकारी कार्तिक जीवणी यांची यशोगाथा खूप इतरांपेक्षा वेगळी आहे. त्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी अनेक प्रयत्न केले आणि प्रत्येकवेळी ते यशस्वी झाले. आयएएस अधिकारी होण्याच्या आपल्या ध्येयाबद्दल ते अगदी स्पष्ट होते आणि त्यासाठी तयारी करत राहिले आणि शेवटी त्यांनी यशाला गवसणी घातली. आज जाणून घेऊयात आयएएस कार्तिक जीवणी यांचा यशस्वी प्रवास.
अभ्यासात सुरुवातीपासूनच हुशार
गुजरातमध्ये राहणारे कार्तिक जीवाणी शालेय जीवनापासून अभ्यासात खूप हुशार होते. आयपीएस अधिकारी झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षणही सुरू केले. मात्र, यानंतरही तरीही त्यांच्यात IAS होण्याची जिद्द होती आणि त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले.आयएएस कार्तिक जिवाणी यांनी गुजराती भाषेत आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतले. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर ते जेईई परीक्षेला बसले. त्यात यशस्वी झाल्यानंतर त्यांनी आयआयटी मुंबईमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.
महाविद्यालयीन काळात UPSC परीक्षेची तयारी
अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना कार्तिक यांनी UPSC परीक्षेत बसून नागरी सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला होता. 2016 पासून कार्तिक यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. 2017 मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते अपयशी ठरले होते. यानंतर त्यांनी 2 वर्षे जोरदार तयारी केली. 2019 मध्ये कार्तिकने दुसऱ्यांदा UPSC परीक्षा दिली आणि त्यात यशही मिळवले.
एकीकडे IPS चे प्रशिक्षण दुसरीकडे IAS ची तयारी
या परीक्षेत कार्तिक यांनी अखिल भारतीय स्तरावर 94 वा क्रमांक मिळविला. मात्र, त्यांची IAS साठी निवड होऊ शकली नाही. IAS होण्यासाठी त्यांना दोन रँकने कमी मिळाली. या प्रयत्नात त्यांची IPS अधिकारी म्हणून निवड झाली. त्यांचे प्रशिक्षणही त्यांनी सुरू केले होते. पण त्याचवेळी IAS होण्यासाठी यूपीएससी परीक्षेची तयारीही सुरू ठेवली होती.
चौथ्या प्रयत्नात मिळाले यश
कार्तिक जीवाणी यांची IPS अधिकारी म्हणून निवड झाली. त्यांचे प्रशिक्षणही त्यांनी सुरू केले होते. यावेळी अचानक त्यांनी तिसऱ्यांदा परीक्षा देण्याचे ठरवले. यामध्ये त्यांनी अखिल भारतीय 84 वा क्रमांक मिळवला. त्यानंतर 2020 मध्ये चौथ्या प्रयत्नात, त्यांनी 8 वी रँक गाठली. यावेळी त्यांनी आयएएस पदाला गवसणी घातली. त्यांनी यूपीएससी परीक्षेत बसण्यासाठी आयपीएस प्रशिक्षणातून 15 दिवसांची रजा घेतली होती.
UPSC परीक्षेत अशा प्रकारे मिळवले यश
कार्तिक जीवाणी रोज 10 तास अभ्यास करायचे. ते कठोर परिश्रमापेक्षा स्मार्ट वर्कला प्राधान्य देतात. कार्तिक बहुतेक रात्री अभ्यास करायचा. त्याच्या तयारीसाठी तो केवळ पुस्तकांवर अवलंबून नव्हता. त्यांनी इंटरनेटचाही वापर केला. यासोबतच ते त्यांच्या नोट्सही बनवत असत. आणि त्यातून ते अभ्यास करायचे