हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Success Story : ब्रोकरेज कंपनी असलेल्या झिरोधाचे नाव आता देशभरात झाले आहे. याद्वारे ऑनलाइन डिमॅट खाते उघडून म्युच्युअल फंडस् , शेअर बाजार आणि इतर गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवता येतात. आता याचा समावेश भारतातील अशा स्टार्टअप्समध्ये झाला आहे जे भरपूर नफा कमवत आहेत. या आर्थिक वर्षातच झिरोधाने सुमारे 2000 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. मात्र झिरोधाला इतक्या मोठ्या उंचीवर पोहोचवणाऱ्या निखिल आणि नितीन कामत या दोन भावांनी फायनान्सचं कोणतेही औपचारिक शिक्षणही घेतलेले नाही. नितीन कामत हे इंजिनिअर आहेत तर निखिल कामतने शाळेतच शिक्षण सोडले होते. याच कारणांमुळे त्यांना आपली कंपनी स्थापन करण्यासाठी कधीही फंड देखील मिळाला नाही. मात्र आज झिरोधाने स्वबळावर एक मोठी कंपनी बनण्याचे यश मिळवले आहे.
या दोन भावांमध्ये मोठे असलेले नितीन कामत हे कंपनीचा लोकप्रिय चेहरा आहे. मात्र, त्यांचा धाकटा भाऊ निखिल कामतचा प्रवासही काही कमी रंजक नाही. सध्या ते कंपनीचे सह-संस्थापक आणि CFO आहेत. आजच्या या बातमीमध्ये त्यांच्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. हे लक्षात घ्या कि, ज्या व्यक्तीने आपले शालेय शिक्षणही पूर्ण केलेले नाही. आज त्याने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर 16,500 कोटी रुपयांची कंपनी बनवली. आज झिरोधाचे मूल्य सुमारे $2 बिलियन इतके आहे. Success Story
वयाच्या 14 व्या वर्षी फोन विकायला सुरुवात
14 वर्षांचा असताना निखिल कामतने वापरलेले फोन विकायला सुरुवात केली. ज्यामुळे त्यांच्या शालेय शिक्षणावर परिणाम झाला. जेव्हा हा प्रकार त्यांच्या आईला समजला तेव्हा त्यांनी सर्व फोन नाल्यामध्ये फेकून दिले. शाळेतील प्रशासनही त्यांच्या अभ्यासाबाबतच्या निष्काळजीपणा बाबत चिडून होते, ज्यामुळे त्यांना दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसण्याची संधी देखील देण्यात आली नाही. यानंतर कामत यांनी शाळाच सोडली. Success Story
कॉल सेंटर केले काम
यानंतर वयाच्या 17 व्या वर्षांपासून त्यांनी एका कॉल सेंटरमध्ये काम करायला सुरुवात केली. जिथे त्यांना सुरुवातील 8,000 रुपये मिळायचे. याबाबत बोलताना कामत सांगतात की,” ते रात्री उशिरापर्यंत काम करायचे आणि मग सकाळी शेअर बाजारात गुंतवणूक करायचे. याचदरम्यान त्यांनी शेअर मार्केटबाबतची भरपूर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना पाठिंबा देत आपले पैसे कामत यांना शेअर बाजारात गुंतवण्यासाठी दिले. याशिवाय कामत यांनी आपल्या कॉल सेंटरमधील सहकाऱ्यांना त्यांच्या पैशांचे मॅनेजमेंट करण्याचे महत्व पटवून दिले. अशा प्रकारे त्यांच्या स्टॉक ब्रोकिंगमधील कारकिर्दीला सुरुवात झाली. यानंतर 2010 मध्ये झिरोधा लाँच करण्यात आले. तसेच 2021 मध्ये निखिल कामत वयाच्या 34 व्या वर्षी अब्जाधीश बनले. Success Story
कंपनीने दिला मजबूत नफा
हे लक्षात घ्या कि, आजपर्यंत झिरोधाला कोणीही फंडींग दिले नाही. तसेच आजपर्यंत बाहेरून एकही पैसा कंपनीत गुंतवला गेला नाही. असे असूनही सध्या झिरोधा ही 16,500 कोटी रुपयांची कंपनी बनली आहे. याबरोबरच निखिल कामतने गेल्या वर्षी हुरुन इंडिया सेल्फ-मेड रिच लिस्टमध्ये अव्वल स्थान देखील पटकावले होते. या लिस्टनुसार, निखिल कामतची एकूण संपत्ती 17500 कोटी रुपये आहे. या आर्थिक वर्षात कंपनीने 2094 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. Success Story
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://zerodha.com/
हे पण वाचा :
Bank FD : खुशखबर !!! ‘ही’ स्मॉल फायनान्स बँक एफडीवर देत आहे 9.50% व्याजदर
Tax Saving Tips : ‘या’ 5 योजनांमध्ये गुंतवणूक करून वाचवा येईल टॅक्स, कसे ते जाणून घ्या
Home Insurance द्वारे अशा प्रकारे मिळेल आपल्या घरातील नुकसानीची आर्थिक भरपाई
EDLI Scheme म्हणजे काय ??? जाणून घ्या त्याच्याशी संबंधित ‘या’ खास गोष्टी
New Business Idea : घरबसल्या कमी खर्चात ‘हे’ व्यवसाय सुरू करून दरमहा मिळवा हजारो रुपयांचे उत्पन्न